शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

सिरियल कीलर महानंदला जन्मठेपेच; सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्षा कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 18:54 IST

महानंदाने तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिचे दागिने लुटून तिची निर्घृण हत्या केली होती.

ठळक मुद्देतरवळे - शिरोडा येथील महानंद नाईक याला फोंडा पोलिसांनी अटक केली होती. सत्र न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा फर्माविली होती. मागाहून महानंदने या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

सूरज पवारमडगाव - वासंती गावडे या खून प्रकरणी सिरियल कीलर महानंद नाईक याची जन्मठेपेची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम केली. शिक्षेविरुध्द महानंद याने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावताना जन्मठेपेच्या शिक्षेवर शिक्कामोत्तब केला. 1995 साली वासंती गावडे खून प्रकरण घडले होते. अत्यंत थंड डोक्याने महानंदाने तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिचे दागिने लुटून तिची निर्घृण हत्या केली होती.तरवळे - शिरोडा येथील महानंद नाईक याला फोंडा पोलिसांनी अटक केली होती. यावेळी संशयिताने सोळा खून केल्याचे उघडकीस आले होते. यातील बहुतेक खून प्रकरणात त्याची निर्दोष सुटका झाली आहे. महानंद याच्या खूनाच्या मालिकाच उघड झाल्याने त्यावेळी संपूर्ण गोवा हादरुन गेला होता. वासंती गावडे ही खडपाबांध - फोडा येथील राहूल अर्पाटमेन्ट येथे एका फ्लॅटात घरकामाला होती. महानंदने तिच्याशी मैत्री करुन 10 सप्टेंबर 1995 साली तिच्याशी विवाहाचा प्रस्ताव ठेवला होता. वासंती हिच्या वडीलाचे निधन झाले होते. तिचे मावसभाउ रामनाथ गावडे व सोनू गावडे हे तिची देखभाल करीत होते. महानंदने 11 सप्टेंबर 1995 साली आपल्या आई - वडिलांची भेट घालून देण्याच्या बहाण्याने वासंतीला सर्व दागदागिने घालून फोंड्यातील मिनिनो हॉटेलजवळ येण्यास सांगितले होते. वासंतीचे फोंडा येथील स्टेट बँकेत खाते होते. आपल्या कमाईचे पैसे ती या बँकेच्या खात्यात भरत होती. महानंदने गोड बोलून तिच्याकडून ही माहितीही काढून घेतली होती. तिच्या बचतखात्यावर रक्कम असल्याने येताना पासबूकही सोबत घेउन येण्यास त्याने सांगितले होते. वासंतीचे पासबूक तिच्या मावसभावाकडे होते. बँक पासबूकची मागणी केल्यानंतर तिच्या मावसभावाने तिला यासंबधी विचारले होते. आपल्या दोन्ही मावसभावांना घेउन वासंती 11 सप्टेंबरला मिनिनो हॉटेलजवळ गेली होती. त्या दोघांना बघून महानंद गडबडला होता. मात्र, त्याही स्थितीत त्याने वासंतीच्या खात्यावर 50 हजार रुपये भरणा करायचे आहे असे सांगून आपण व ती रिक्षातून बँकेत जातो असे सांगून तो वासंतीला घेउन रिक्षातून गेला होता. मागाहून रामानाथ व सोनू हे दोघेही चालत बँकेत गेले असता, वासंती व महानंद त्यांना दिसले नाही. सर्वत्र शोध घेउनही वासंती न सापडल्याने मागाहून यासंबधी फोंडा पोलीस तक्रारही नोंदविली होती.महानंदने वासंतीला ओपा जलशायाजवळील एका निर्जनस्थळी नेले होते. तिथे दुप्पटटयाने तिचा गळा आवळला व तिच्याअंगावरील दागिने काढून घेउन नंतर मृतदेह ओपला जलाशयात फेकून दिला होता. सरकारी वकील सुभाष देसाई यांनी पणजी सत्र न्यायालयात हा खटला प्रभावीपणो मांडताना एकूण बारा साक्षीदार तपासले होते. सत्र न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा फर्माविली होती. मागाहून महानंदने या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तेथे हे आव्हान फेटाळून लावल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात त्यांनी या शिक्षेविरुध्द अपील केले होते.

टॅग्स :MurderखूनCourtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालयsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिस