शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांना समन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 22:01 IST

मुख्यमंत्री शहरात येणार असताना आंदोलन करू न देता पोलिसांनी ताब्यात घेतल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्देराज्य मानवी हक्क आयोग : मारुती भापकर यांनी मागितली दाद

पिंपरी : पिंपरी : मुख्यमंत्री शहरात येणार असताना आंदोलन करू न देता पोलिसांनी ताब्यात घेतल्याप्रकरणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाकडे दाद मागितली. त्यानुसार पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांना मानवी हक्क आयोगाने समन्स बजावले आहेत. त्यानुसार सोमवारी (दि. १६) आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  मारुती भापकर यांनी मानवी हक्क आयोगाकडे दिलेल्या तक्रारीनुसार, निगडी प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानावर दि. ३ नोव्हेंबर २०१८ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ह्यअटल संकल्प महासंमेलनह्ण आयोजित करण्यात आले होते. या वेळी आंदोलन करण्याबाबत मारुती भापकर यांनी निगडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे यांना निवेदन दिले. आंदोलन करता येणार नाही, असे सांगून भापकर यांना नोटीस देण्यात आली. त्यानंतर दि. ३ नोव्हेंबर रोजी मोहननगर पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख व इतर दोन पोलीस कर्मचाºयांनी सकाळी पावणे अकराच्या सुमारास भापकर यांना त्यांच्या घरून पिंपरी पोलीस ठाण्यात घेऊन गेले. त्यानंतर पिंपरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांनी नोटीस देऊन भापकर यांना ताब्यात घेतले. रात्री साडेआठपर्यंत त्यांना पोलीस ठाण्यात थांबवून ठेवले. दरम्यान त्यांना पाणी व जेवण दिले नाही. संविधानाने दिलेल्या अधिकारांची पायमल्ली झाली, असे भापकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त पद्मनाभन, तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, प्रदीप लोंढे, सहायक पोलीस आयुक्त अन्सार शेख, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा सात प्रतिवादींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच नुकसान भरपाई म्हणून एक रुपया देण्यात यावा, अशी मागणी भापकर यांनी केली आहे. भापकर यांनी दाद मागितल्यानुसार मानवी हक्क आयोगाने समन्स बजावले आहेत. याप्रकरणी सोमवार, दि. १६ सप्टेंबर रोजी समन्स बजावलेल्या प्रतिवादींनी मानवी हक्क आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.[9:49 ढट, 9/13/2019] ऊीीस्रं‘ ङ४’‘ं१ल्ल्र: ॅँी३’्र ंंँी

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयPoliceपोलिस