शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
3
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
4
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
5
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
6
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
7
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
8
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
9
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
10
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
11
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
13
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
14
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
15
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
16
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
17
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
18
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
19
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
20
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल

नोरा फतेहीला पटवण्यासाठी सुकेश चंद्रशेखरने काय काय दिल्या होत्या तिला ऑफर? वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 12:51 IST

Sukesh Chandrashekhar Case : सुकेश चंद्रशेखर तिला गर्लफ्रेंड बनवण्यासाठी लक्झरी गाडीपासून ते ऐशोआरामाच्या जीवनाची ऑफर दिली होती. तिने दावा केला की, सुकेशने त्याची सहकारी पिंकी ईराणीच्या माध्यमातून ही ऑफर दिली होती. 

तुरूंगात कैद सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) शी निगडीत 200 कोटी रूपयांच्या खंडणी केसमध्ये एक मोठा खुलाला झाला आहे. सुकेश चंद्रशेखर विरोधातील 200 कोटी रूपयांच्या वसूली केसमध्ये साक्षीदार बनलेली अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) ने काही दिवसांआधी तिचा जबाब कोर्टात नोंदवला होता. ज्यात तिने दावा केला होता की, सुकेश चंद्रशेखर तिला गर्लफ्रेंड बनवण्यासाठी लक्झरी गाडीपासून ते ऐशोआरामाच्या जीवनाची ऑफर दिली होती. तिने दावा केला की, सुकेशने त्याची सहकारी पिंकी ईराणीच्या माध्यमातून ही ऑफर दिली होती. 

इंडियन एक्सप्रेसच्या एका वृत्तानुसार, 13 जानेवारीला कोर्टात जबाब देताना नोराने दावा केला की, सुकेश चंद्रशेखर म्हणाला होता की, जर मी त्याची गर्लफ्रेंड बनले तर तो मला एक मोठं घर, कार आणि लक्झुरिअस लाइफस्टाईल देणार. ती म्हणाली की, पिंकी ईराणीने तिच्या चुलत भावाला संपर्क केला होता आणि म्हणाली होती की, सुकेशची ऑफर स्वीकारण्यासाठी जॅकलीन फर्नांडीस लाइनमध्ये आहे. पण सुकेशला तू जास्त आवडते. इतकंच नाही तर ईराणी असंही म्हणाली होती की, सुकेशसाठी अनेक हिरोईन आतुर आहेत.

नोराने कोर्टात सांगितलं की, तिला सुकेशची पत्नी अभिनेत्री लीना मारियाने चेन्नईमध्ये आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बोलवलं होतं. तिला कार्यक्रमात चीफ गेस्ट बनने, एका डान्स कॉम्पिटिशनसाठी जज बनने आणि दिव्यांग मुलांना पैशांचं एक पाकिट देण्यासाठी सांगण्यात आलं होतं. कार्यक्रमानंतर सुकेशने थॅंक्यू टोकन म्हणून एक कार मला ऑफर केली होती. नोरा म्हणाली की, मी कार नाकारली होती. कारण त्याने आधीच एक आयफोन आणि गुस्सीची बॅग गिफ्ट दिली होती. पण आरोपी सुकेश कार घेण्यासाठी मागे लागला होता.

त्यानंतर नोराने सांगितलं की, कारसाठी पुन्हा पुन्हा जोर दिल्यावर तिने तिचा नातेवाईक बॉबीसोबत सुकेशचा परिचय करून दिला होता. आरोपी सुकेश आणि बॉबीने एका सिनेमाची डील केली. ज्यात सिनेमा साइन करण्याच्या बदल्यात सुकेश नोराला एक बीएमडब्ल्यू कार गिफ्ट देणार होता. अशाप्रकारे नोराला सुकेशने बीएमडब्ल्यू कार गिफ्ट केली. पण ही कार तिचा नातेवाईक बॉबीकडेच होती. कारण त्यावेळी नोरा दुबईला गेली होती. 

जेव्हा ती दुबईमध्ये होती तेव्हा तिला बॉबीचा फोन आला की, सुकेशच्या ऑफरबाबत टीव्ही अॅंकर ईराणीने त्याला संपर्क केला आणि म्हणाली की, जर नोरा फतेही सुकेशची गर्लफ्रेंड बनली तर तिच्या जगण्याचा आणि  करिअरचा सगळा खर्च तो उचलेल. सुकेशने ऑफर पाठवली होती की, जर नोरा त्याची गर्लफ्रेंड बनली तर तो तिला सगळ्या सुख-सुविधा देणार.

दरम्यान दिल्ली पोलिसांनी याच सोमवारी कोर्टाला सांगितलं होतं की, कथित ठग सुकेश चंद्रशेखरची सहकारी पिंकी ईराणीने चंद्रशेखरची अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीससोबत भेट करून दिली आणि ईराणीनेच 200 कोटी रूपयांच्या वसूलीत महत्वाची भूमिका बजावली. आता जॅकलीन आणि नोरा दोघीही या केसमध्ये साक्षीदार झाल्या आहेत. 

टॅग्स :Nora fatehiनोरा फतेहीCrime Newsगुन्हेगारी