शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

भयंकर! अल्पवयीन प्रियकराची आत्महत्या; गावकऱ्यांनी मृतदेहासोबत लावलं प्रेयसीचं लग्न, केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 15:21 IST

Crime News : संतप्त झालेल्या लोकांनी प्रियकराच्या मृतदेहासोबतच प्रेयसीचं लग्न लावून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना पश्चिम बंगालच्या बर्दवानमध्ये घडली आहे. एकता अल्पवयीन प्रियकराने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या लोकांनी प्रियकराच्या मृतदेहासोबतच प्रेयसीचं लग्न लावून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा आणि त्याची प्रेयसी यांचे धर्म वेगवेगळे होते. दोघांचेही नातेवाईक त्यांच्या लग्नासाठी तयार होते. मात्र, मुलगा अल्पवयीन असल्याने मुलीची आई या लग्नासाठी तयार नव्हती. याच कारणावरुन मुलगा आणि मुलीमध्ये वाद झाला आणि यातूनच मुलानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्या करण्याआधी या मुलाने आपल्या प्रेयसीला आपण आत्महत्या करत असल्याचं सांगितलं होतं. यानंतर त्यानं व्हॉट्सएपवर प्रेयसीला आपला फोटो देखील पाठवला आणि आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदनानंतर या मुलाचा मृतदेह गावात आणण्यात आला आणि पुन्हा एकदा वाद सुरू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिकांनी याप्रकरणी मुलगी आणि तिच्या आईला जबाबदार धरत दोघींना बेदम मारहाण केली. यानंतर दोघींलाही जबरदस्ती मुलाच्या मृतदेहाजवळ आणण्यात आलं. यानंतर मुलाच्या मृतदेहाकडून मुलीच्या भांगेत कुंकू भरण्यात आलं. शहरातील कांटापुकूर परिसरात हा मुलगा राहत होता. मृताच्या शेजाऱ्यांनी या मुलीला याची कल्पना होती, की मुलगा आत्महत्या करत आहे असं म्हटलं आहे.

मुलीकडे त्याच्या आईचा फोन नंबरही होता. मात्र, तरीही तिने याबाबत मुलाच्या कुटुंबीयांनी याबाबत माहिती दिली नाही. वेळेवर मुलाच्या घरच्यांना याबाबत माहिती दिल्यास त्याला वाचवता आलं असतं, असं त्यांनी म्हटलं आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मारहाण आणि अल्पवयीन मुलीसोबत छेडछाड केल्याची तक्रार मुलीच्या आईनंही पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. आरोपींविरोधात कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू