शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

बलात्कार करून ब्लॅकमेल करणाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 5:07 AM

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील संतापजनक घटना

सेनगाव (जि. हिंगोली) : पाच वर्षांपूर्वी गर्भवती महिलेवर बलात्कार करून तिघांनी त्याचा व्हिडीओ बनवला. त्याआधारे तिघे वारंवार ब्लॅकमेल करीत असल्याने विवाहितेने गुरुवारी घरीच गळफास घेऊन स्वत:ला संपविले.

तिने लिहिलेल्या चिठ्ठीत तीन आरोपींची नावे आहेत. त्यांच्यामुळेच आत्महत्या करीत असल्याचे त्यात म्हटले आहे. याप्रकरणी चंद्रभान गणपत कायंदे , परमेश्वर नारायण वावरे, सुरेश नामदेव कायंदे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून तिघेही फरार आहेत.

सेनगाव तालुक्यातील महिलेवर आरोपींंनी २२ डिसेंबर २०१५ ला तिच्या घरात घुसून अत्याचार केला होता. तेव्हा ती दोन महिन्यांची गर्भवती होती. आरोपींनी अत्याचाराचा व्हीडिओ तयार केला होता. कुटुंबियांना सांगितल्यास संसार उद्ध्वस्त होईल, अशी भीती तिला वाटत होती. त्यानंतरही आरोपी हा व्हीडिओ दाखवून तिची बदनामी करीत होते. २0१६ मध्ये तिला पुन्हा शरीरसुखाची मागणी करून आरोपींकडून त्रास दिला जात होता. शेवटी कंटाळून तिने सेनगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. त्याची सुनावणी अद्याप पूर्ण झाली नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. न्यायालयामध्येच इलेक्ट्रिक बोर्डात हात घालून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे न्यायालयात तिला माफीही मागावी लागली होती.पोलिसांची टाळाटाळविवाहितेने तीन आरोपींविरुद्ध दिलेल्या तक्रारीचे प्रकरण सेनगाव पोलीस ठाण्यात दाखल होते. मात्र पोलिसांनी गांभीर्याने न घेतल्यानेच विवाहितेला आत्महत्या करण्याची वेळ आली, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारSuicideआत्महत्या