महिलेची हत्या करून केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 01:23 IST2019-06-07T01:22:52+5:302019-06-07T01:23:02+5:30

चार जून रोजी ते दोघेही पनवेल तालुक्यातील वीर पार्क हॉटेलमध्ये आले होते. यावेळी त्या दोघांमध्ये वाद झाला व दुशिंगने तिची गळा दाबून व डोक्यात खुर्ची घालून हत्या केली.

Suicide by killing woman | महिलेची हत्या करून केली आत्महत्या

महिलेची हत्या करून केली आत्महत्या

पनवेल : सुकापूर येथील वीर पार्क हॉटेलमध्ये बुधवार, ५ जून रोजी सापडलेल्या दोन मृतदेहांमुळे खळबळ उडाली. यातील महिलेला गळा दाबून व खुर्ची डोक्यात घालून मारण्यात आले असून, आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास हॉटेलच्या एका रूममध्ये महिला व पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. मात्र, त्यांची ओळख पटली नव्हती. पोलिसांनी दिलेल्या अधिक महितीनुसार रावसाहेब गोटीराम दुशिंग (४९, सायन कोळीवाडा) यांचे एका ३४ वर्षीय महिलेसोबत प्रेमप्रकरण होते.

चार जून रोजी ते दोघेही पनवेल तालुक्यातील वीर पार्क हॉटेलमध्ये आले होते. यावेळी त्या दोघांमध्ये वाद झाला व दुशिंगने तिची गळा दाबून व डोक्यात खुर्ची घालून हत्या केली. त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी दुपारी २ वाजता ते हॉटेलमधून बाहेर निघणार होते, मात्र त्यांनी चेक आउट न केल्यामुळे हॉटेलच्या कर्मचाऱ्याने दरवाजाची बेल वाजवली. मात्र, आतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी खिडकीतून आत प्रवेश केला असता त्यांना समोर भयानक दृष्य दिसले. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली असून याप्रकरणी खांदेश्वर पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Suicide by killing woman