शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Video : चेंबूरमध्ये स्वत:वर गोळी झाडून बिल्डरची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 15:57 IST

आज सकाळी ११. २५ वाजताच्या सुमारास बिल्डर संजय अग्रवाल (५७) यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. यावेळी घरी भावोजी आणि मुलगा हे देखील होते. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे

ठळक मुद्देचेंबूरमधले प्रसिद्ध बिल्डर संजय अग्रवाल हे संजोना विकासकचे मालक आहेत. बिल्डर संजय अग्रवाल (५७) यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. याप्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

मुंबई - चेंबूरमध्ये एका बिल्डरने कार्यालयात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आज सकाळी ११. २५ वाजताच्या सुमारास बिल्डर संजय अग्रवाल (५७) यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेदरम्यान केबिनबाहेर भावोजी, वाहिनी, मुलगा आणि कर्मचारी हे देखील होते. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

चेंबूरमधले प्रसिद्ध बिल्डर संजय अग्रवाल हे संजोना विकासकचे मालक आहेत. त्यांनी घरात परवानाधारक रिव्हॉल्वरने गोळी झाडून घेतल्या. त्यांच्या या आत्महत्येमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.चेंबूर येथील सिंधी कॉलनीमध्ये सन्जोना कॉम्प्लेक्स नावाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ते होते. त्याच ठिकाणी त्यांचे कार्यालय देखील आहे. आज सकाळी ११. २५ वाजताच्या दरम्यान त्यांनी राहत्या घरी स्वतःच्या  परवानाधारक रिव्हॉल्वरने गोळी झाडून घेतली. नंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला. या आत्महत्येमागील कारण मात्र समोर आलेले नाही असे पोलीस सूत्रांनी सांगितले. या आत्महत्येमागील नेमके कारण मात्र समोर आलेले नाही. मात्र, कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार चेंबूर येथील १० व्या रोडवरील प्रकल्प दिवसेंदिवस रेंगाळत असल्याने अग्रवाल तणावाखाली होते. त्यामुळे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस