औरंगाबादेत बँक व्यवस्थापकाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 12:40 IST2018-07-12T12:39:25+5:302018-07-12T12:40:41+5:30

समर्थनगर येथील रहिवासी बँक व्यवस्थापकाने राहत्या घरी लोखंडी हुकलला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी साडेआठ ते पावणे नऊ वाजेच्या सुमारास घडली. 

A suicide of bank manager in Aurangabad | औरंगाबादेत बँक व्यवस्थापकाची गळफास घेऊन आत्महत्या

औरंगाबादेत बँक व्यवस्थापकाची गळफास घेऊन आत्महत्या

औरंगाबाद: समर्थनगर येथील रहिवासी बँक व्यवस्थापकाने राहत्या घरी लोखंडी हुकलला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी साडेआठ ते पावणे नऊ वाजेच्या सुमारास घडली. धमेंद्र दिगंबर पुराणिक (४५,रा. अर्चना अपार्टमेंट, समर्थनगर)असे मृताचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, धमेंद्र हे उस्मानपुरा येथील अजिंठा अर्बन सहकारी बँकेचे व्यवस्थापक होते. आज सकाळी ते नेहमीप्रमाणे झोपेतून उठले. त्यानंतर त्यानंतर त्यांची पत्नी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी ड्रायव्हिंग स्कुलला गेली. तर मुलगा आणि मुलगी शाळेत गेली. त्यानंतर त्यांनी घरातील लोखंडी हुकलला दोरीने बांधून गळफास लावून घेतला. साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांच्या मुलीला हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरड केली. 

शेजारी लोकांनी त्यांच्या घरी धाव घेतली. नंतर पुराणिक यांच्या पत्नीला आणि पोलिसांना फोन करून घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी पुराणिक यांचा मृतदेह घाटीत हलविला. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी क्रांतीचौक ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: A suicide of bank manager in Aurangabad