शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

तडीपार आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; अंबोली पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 17:18 IST

काल हा प्रकार अंबोली पोलीस ठाण्यात घडला आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. या आरोपात काहीच तथ्य नसून पोलिसांना विनाकारण बदनाम करण्यासाठी त्याने हा प्रकार केल्याचे वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देजयसिंग चौहान (वय ४८) या तडीपार आरोपीने पोलीस ठाण्यातच विषप्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला.काल हा प्रकार अंबोली पोलीस ठाण्यात घडला आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. तो अभिलेखावरील गुन्हेगार असून पोलिसांची बदनामी करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मुंबई - पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अडकवून पैशांची मागणी करत असल्याचा आरोप करत जयसिंग चौहान (वय ४८) या तडीपार आरोपीने पोलीस ठाण्यातच विषप्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. काल हा प्रकार अंबोली पोलीस ठाण्यात घडला आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाल्याने खळबळ उडाली. या आरोपात काहीच तथ्य नसून पोलिसांना विनाकारण बदनाम करण्यासाठी त्याने हा प्रकार केल्याचे वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.चौहान याने हा प्रकार करण्यापूर्वी मोबाइलवर एक व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यामध्ये तो पोलिसांच्या चौकशीला कंटाळला असून त्याच्याकडून काही वरिष्ठ अधिकारी पैशाची मागणी करत आहेत, दबाव टाकत आहेत. त्यामुळे अंबोली पोलीस ठाण्यात जाऊन तो आत्महत्या करणार असल्याचे सांगत ती क्लिप सोशल मीडियावर वायरल केली. या व्हिडीओमध्ये त्याने अंबोली पोलीस ठाण्याचे दोन तर डी. एन. नगर पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्यावर आरोप केला असून त्याच्या मृत्यूसाठी त्यांनाच जबाबदार धरले जावे अशी विनंती देखील केली आहे. काल अंबोली पोलीस ठाण्यात जाऊन कीटकनाशकाच्या बाटलीतील द्रव्य त्याने प्राशन केले. मात्र, तातडीने त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. चौहानवर तडीपारीची कारवाई आम्ही केली आहे. त्यामुळेच त्याने हा प्रकार केला, अशी माहिती अंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांनी दिली. तो अभिलेखावरील गुन्हेगार असून पोलिसांची बदनामी करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. गेल्या महिन्यात म्हणजे १६ नोव्हेंबरला एका महिला पत्रकाराचा पाठलाग केल्याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दया नायक यांनी चौहान आणि तासांत पकडून डी. एन. नगर पोलिसांच्या स्वाधीन केले होते. 

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीAndheriअंधेरी