शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काराच्या आरोपात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची पोलीस ठाण्यात आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 20:07 IST

Suicde Case : डेथ इन कस्टडी ? : गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आत्मघात

ठळक मुद्देगेल्या ३४ दिवसांमधील अमरावती आयुक्तालयातील ही दुसरी डेथ इन कस्टडी ठरली आहे.अरूण बाबाराव जवंजाळ (५०, रा. आष्टी, ता. भातकुली, जि. अमरावती) असे मृताचे नाव आहे.

अमरावती : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतलेल्या व्यक्तीने पोलीस ठाण्यातच गळफास घेऊन आत्महत्या केली. शहर आयुक्तालयातील वलगाव पोलीस ठाण्याच्या परिसरात गुरुवारी दुपारी ४ ते ५ च्या सुमारास ही घटना घडली. गेल्या ३४ दिवसांमधील अमरावती आयुक्तालयातील ही दुसरी डेथ इन कस्टडी ठरली आहे.

        

अरूण बाबाराव जवंजाळ (५०, रा. आष्टी, ता. भातकुली, जि. अमरावती) असे मृताचे नाव आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून पंचनाम्यासाठी जिल्हा सत्र न्यायाधीश व भातकुलीचे उपविभागीय अधिकारी वलगाव पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. वृत्त लिहिस्तोवर पंचनाम्याची प्रक्रिया सुरू होती. घटनास्थळी पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्यासह मोठा फौजफाटा तैनात आहे.

सीआयडीचे अधीक्षक अमोघ गावकर व उपअधीक्षक दीप्ती ब्राम्हणे यांनी तपासाची प्रक्रिया आरंभली आहे. पोलीस ठाण्याच्या स्टेशन डायरीवर फिर्यादीचे बयाण नोंदविणे सुरू असताना अरूण जवंजाळ यांना आष्टी येथून ताब्यात घेऊन वलगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांना पोलीस ठाण्याच्या आवारातील एका खोलीत बसवून ठेवण्यात आले. ते तेथे एकटेच होते. ती संधी साधत त्यांनी स्वत:च्या शर्टच्या सहाय्याने तेथील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने हा प्रकार उघड झाला. बलात्कार व पोस्कोचा गुन्ह्याची नोंद दुपारी ४.४४ वाजता करण्यात आली. त्याआधीच त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसambernathअंबरनाथCrime Newsगुन्हेगारी