विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:52 PM2021-07-20T16:52:29+5:302021-07-20T16:52:35+5:30

Suicide of accused accused of molestation : विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या ५५ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Suicide of accused accused of molestation | विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीची आत्महत्या

विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीची आत्महत्या

Next
कमत न्यूज नेटवर्कखामगाव: सावत्र मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या ५५ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी जलंब पोलिसस्टेशनच्या हद्दीत उघडकीस आली. विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर लागलीच संबंधिताने आत्महत्या केल्याने, वाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.- वाडी येथील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने तिच्या सावत्रबापाविरोधात विनयभंग केल्याची तक्रार शहर पोलिसांत केली. या तक्रारीच्या अनुषंगाने शहर पोलिसांनी रविवारी ५५ वर्षीय सावत्र बापाविरोधात  भादंवि कलम ३५४, ३५४ अ, ३२३, ५०४, ५०६ आणि पोक्सो अ‍ॅक्ट २०१२ सहकलम ८ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीच्या शोधात पोलिस असतानाच, विनयभंगाच्या आरोपीने जलंब पोलिस स्टेशनच्या हद्दीत गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले असून, आत्महत्या केलेल्या इसमाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी खामगाव येथील सामान्य रूग्णालयात आणण्यात आला. या घटनेची माहिती संबंधित इसमाच्या नातेवाईकांना मिळताच, तक्रारदार मुलगी, तिची आई आणि तिच्या नातेवाईकांमध्ये वाद विवाद झाले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत दोन्ही बाजूच्या नातेवाईकांमधील वाद मिटविला. यापूर्वीही केला होता विनयभंगाचा प्रयत्न! विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या इसमाने यापूर्वीही असाच प्रयत्न यापूर्वीही केला होता. त्यावेळी तब्बल सात दिवस तो घराबाहेर होता. त्यामुळे पोलिसांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, तो मिळून न आल्याने रात्री पोलिसांनी शोध मोहिम थांबविली. अखेर मंगळवारी त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले.  या इसमाची आत्महत्या चुकीच्या आरोपातून की पश्चातापातून अशी चर्चा आता परिसरात रंगली आहे.

Web Title: Suicide of accused accused of molestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.