Student Suicide News: पदवीच्या पहिल्या वर्षाला शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. वर्गात शिक्षक समोर बसलेले असताना अचानक विद्यार्थी उठला आणि बाहेर गेला. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. नारायणा कॉलेजचा हा विद्यार्थी असून, त्याचे नाव चरण आहे.
शिक्षकासमोरून चालत बाहेर गेला अन्...
नारायणा कॉलेजमध्ये शिकत असलेला चरण वर्गात बसलेला होता. सकाळी १०.१५ वाजता अचानक तो उठून उभा राहिला. त्यावेळी त्याचे शिक्षक शिकवत होते. तो शिक्षकाच्या समोर चालत बाहेर गेला.
अचानक चरण बाहेर जात असल्याचे पाहून वर्गातील विद्यार्थी त्याला पाहू लागले. बाहेर कशासाठी चाललाय हे बाकीचे विद्यार्थी बघत होते. तितक्या चरण व्हरांड्यातील भिंतीवर चढला आणि खाली उडी मारली.
तिसऱ्या मजल्यावरून खाली पडलेल्या चरणला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केली. त्याच्या आत्महत्येच्या कारणाचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.