अशी आहे ४०-४५ हजार मुंबई पोलिसांची फौज; ट्विटरवर २५ लाख फॉलोअर्स 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 02:53 PM2022-04-25T14:53:30+5:302022-04-25T14:53:55+5:30

Mumbai Police :

Such is the army of 40-45 thousand Mumbai police; 2.5 million followers on Twitter | अशी आहे ४०-४५ हजार मुंबई पोलिसांची फौज; ट्विटरवर २५ लाख फॉलोअर्स 

अशी आहे ४०-४५ हजार मुंबई पोलिसांची फौज; ट्विटरवर २५ लाख फॉलोअर्स 

googlenewsNext

मुंबई : स्कॉटलँड यार्ड पोलिसांशी तुलना होणारे मुंबई पोलीस जगातील सर्वोकृष्ट पोलीस असल्याचे मत उच्च न्यायालयानेही वर्तवले होते. मुंबई पोलीस आयुक्त पद हे पोलीस महासंचालक दर्जाचे आहे. त्यांच्या अधिपत्याखाली पाच सह पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून पूर्ण पोलीस खात्याचा कारभार चालतो. जवळपास ४० ते ४५ हजार पोलिसांचा फौजफाटा येथे कार्यरत आहे.

पोलीस आयुक्त संरचना
संजय पांडे, आयुक्त

प्रवीण कुमार पडवळ,  
सह आयुक्त (आर्थिक गुन्हे)
 

विश्वास नांगरे पाटील, 
सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था)
 

राज वर्धन, सह आयुक्त (वाहतूक)


सुहास वारके, सह आयुक्त (गुन्हे)

राजकुमार व्हटकर, सह आयुक्त (प्रशासन),

प्रादेशिक विभाग
अपर पोलीस आयुक्त
विनायक देशमुख, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग)
वीरेंद्र मिश्रा, अपर पोलीस आयुक्त (उत्तर प्रादेशिक विभाग)
संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग)
डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त (मध्य प्रादेशिक विभाग)
दिलीप सावंत, अपर पोलीस आयुक्त (दक्षिण प्रादेशिक विभाग)


पोलीस उपायुक्त
परिमंडळ १  - डॉ. हरी बालाजी. एन 
परिमंडळ २ - नीलोत्पल 
परिमंडळ ३ - रिक्त
परिमंडळ ४ - रिक्त
परिमंडळ ५ - प्रणय अशोक 
परिमंडळ ६ - कृष्णकांत उपाध्याय 
परिमंडळ ७- प्रशांत कदम 
परिमंडळ ८ - डॉ. डी. एस. स्वामी
परिमंडळ - ९ - मंजुनाथ सिंगे 
परिमंडळ - १० - डॉ. महेशकुमार रेड्डी
परिमंडळ - ११ - विशाल ठाकूर 
परिमंडळ -१२ - सोमनाथ घार्गे 

पहिले आयुक्त आणि पोलीस दल 
मुंबई शहर पोलीस दलाचा इतिहास १६६९ पासूनचा आहे, ज्यामध्ये अंदाजे ५०० सामान्य पुरुषांच्या भंडारी मिलीशियाचा समावेश होता. १४ जून १८५६ रोजी, १८५६ च्या XIII व्या कायद्याने पोलीस आयुक्त या पदाची निर्मिती केली गेली. विल्यम क्रॉफर्ड यांना मुंबई शहर व बेटांसाठी पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तसेच १ नोव्हेंबर, १८५६ पासून पोलिसांचे वरिष्ठ दंडाधिकारी म्हणून आपले कर्तव्य बजावत होते. जे.  एस. भरुचा आयपी (१५ ऑगस्ट १९४७ - मे १९४९) हे स्वतंत्र भारतात मुंबईचे पहिले आयुक्त बनले.  सुरतच्या श्रीमंत पारसी कुटुंबातून आलेले भरूचा यांनी ऑक्सफर्ड येथून शिक्षण घेतले होते.

मुंबई पोलिसांची लाखांची टिव टिव 
मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर २५ लाख फॉलोव्हर्स आहेत. ट्विटरवरील हटके नेहमीच चर्चेत असणार ट्विट केलेले असतात. या ट्विटरमुळे मुंबई पोलिसांची ख्याती सातासमुद्रापारही पोहोचली आहे.

संख्याबळ              मंजूर    कार्यरत    रिक्त
पोलीस आयुक्त          ०१    ०१           ०० 
सह आयुक्त               ०५    ०५            ०० 
अपर पोलीस आयुक्त  ११    ११           ०० 
पोलीस उपायुक्त         ४१    ३९           ०२ 
सहायक पोलीस आयुक्त    १२८    ९५    ३३ 
पोलीस निरीक्षक     १०३२    ७९६    २३६ 
सहायक पोलीस निरिक्षक    १०९३    ९११    १८२ 
पोलीस उपनिरीक्षक    ३२७९    २३७१    ९०८ 
सहायक पोलीस उपनिरीक्षक    ३२२१    ३०६९    १५२
पोलीस हवालदार    ८२४६    ६७५२    १४९४ 
पोलीस नाईक    ७१९८    ६५९९    ५९९ 
पोलीस शिपाई    २१९५७    १६८१६    ५१४१

Web Title: Such is the army of 40-45 thousand Mumbai police; 2.5 million followers on Twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.