सब गोलमाल है... ना पिन सांगितला, ना ओटीपी... तरीही रिकामी झाली 'त्यांची' खाती!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 02:16 PM2019-08-28T14:16:31+5:302019-08-28T14:18:33+5:30

ना ओटीपी सांगितला ना पिन क्रमांक सांगितला.

Sub Golmaal Hai ... no PIN, no OTP ... anyway their 'accounts' are empty! | सब गोलमाल है... ना पिन सांगितला, ना ओटीपी... तरीही रिकामी झाली 'त्यांची' खाती!

सब गोलमाल है... ना पिन सांगितला, ना ओटीपी... तरीही रिकामी झाली 'त्यांची' खाती!

Next
ठळक मुद्देमुंबईतील एका तरुणीने ऑनलाईन सर्च करून मद्य मागवले आणि नंतर तिच्या बँक खात्यातून ८७,४२० रुपये गायब झाले आहेत.दुसरीकडे एका महिलेने आपला बँक खात्याचा नंबर ऑनलाईन सर्च केला तिच्या खात्यातून ९० हजार रुपये गायब झाले.

मुंबई - मोबाईलवर ओटोपी आणि पिन सांगितल्यानंतर बँक खात्यातून पैसे काढले जातात. मात्र, सायबर चोरांनी आता नवीन मोडस ऑपरेंडी शोधून काढली आहे. हे ठग गुगलवर आपले बनावट नावाने नंबर पोस्ट करतात आणि या नंबरवर फोन करणारे ठगांच्या जाळ्यात सापडतात. मुंबईतील एका तरुणीने ऑनलाईन सर्च करून मद्य मागवले आणि नंतर तिच्या बँक खात्यातून ८७,४२० रुपये गायब झाले आहेत. तर दुसरीकडे एका महिलेने आपला बँक खात्याचा नंबर ऑनलाईन सर्च केला तिच्या खात्यातून ९० हजार रुपये गायब झाले होते. आश्चर्याची गोष्ट ही आहे की, या घटनांमध्ये पीडित महिलांनी आपला ना ओटीपी सांगितला ना पिन क्रमांक सांगितला. तरीदेखील त्यांच्या बँक खात्यातून हजारो रुपये गायब झाले आहेत. 

पवई येथे राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीन दारूच्या होम डिलेव्हरी सर्व्हिस पुरविणाऱ्या वाईन शॉपचे संपर्क क्रमांक गुगलवर सर्च केले. आंतरराष्ट्रीय बँकेत काम करणाऱ्या या तरुणीला स्टार वाईनचा क्रमांक मिळाला. त्या क्रमांकावर तिने कॉल केला असता फोन उचलणाऱ्या व्यक्तीने तिला यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस आईडी देऊन त्यावर मोबाईल वॉलेटने ३ बियरचे ४२० रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. तरुणीने त्याप्रमाणे ४२० रुपये ट्रान्सफर केले आणि त्याचा मेसेस देखील तिला मोबाईलवर आला. थोड्या वेळाने पुन्हा त्या तरुणीच्या मोबाईलवर २९००० रुपये बँक खात्यातून काढल्याबाबत दुसरा मेसेस आला. पिन आणि ओटीपीशिवाय बँक खात्यातून पैसे गेल्याने तरुणी हैराण झाली. तरुणीने सांगितले की, तिने फक्त ४२० रुपये ट्रान्सफर केले होते. वाईन शॉपवाल्याला ना ओटीपी सांगितलं, ना पिन सांगितला. तसेच त्याला आपली काहीच माहिती दिलेली नव्हती. तरुणीने पुन्हा त्या संपर्क क्रमांकावर कॉल केला. त्यावेळी फोन उचलणाऱ्याने चुकून पैसे कट झाले असतील, ते पुन्हा खात्यात जमा होतील, असे सांगितले. दरम्यान या तरुणीच्या बँक खात्यातून पुन्हा ५८००० काढण्यात आले. नंतर तरुणीने ज्या स्टार वाईन शॉपमधून बियर मागवली होती. ते दुकान गाठले. त्यावेळी धक्कादायक माहिती तिच्या समोर उघड झाली की ज्या संपर्क क्रमांकावर तिने कॉल केला होता. तो त्या दुकानाचा नव्हताच. याबाबत तरुणीने ताबडतोब पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अशा प्रकारे ११ ऑगस्टला एका पायलटसोबत देखील घटना घडली. त्याने सुद्धा दारू होम डिलेव्हरी ऑर्डरने मागवली. त्यावेळी त्यांच्या बँक खात्यातून ३८००० रुपये वजा झाले. तसेच जुलैमध्ये खार येथे राहणाऱ्या एका व्यक्तीच्या खात्यातून ३५५०० रुपये गायब झाले. त्याचप्रमाणे १६ जूनला अंधेरीतील एकास २०००० रुपयांचा चुना लावण्यात आला. 

बँकेच्या फोनवर केला फोन आणि काढले ९० हजार 

या प्रकरणात घाटकोपर येथील २९ वर्षीय तरुणीचे देवनारच्या स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत खाते आहे. तरुणीची बहीण यूएसमध्ये राहत असून तिला पैसे ट्रान्सफर करायचे होते. त्यासाठी तरुणीने गुगलवर बँकेचा संपर्क क्रमांक सर्च केला आणि त्या क्रमांकावर तिने कॉल केला. फोन उचलणाऱ्याने आपलं नाव राहुल कुमार सांगितलं. गोवंडी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल असून राहुल नामक व्यक्तीने तरुणीकडे बँकेची माहिती मागितली. राहुलने सांगितले की, काही वेळातच एसडब्ल्यूआईएफटी कोट देईल असं तरुणीला सांगितलं. दरम्यान, त्यानंतर तिच्या खात्यातून ९०००० रुपये कट झाले. ज्यावेळी तरुणीने बँकेत संपर्क साधला त्यावेळी राहुल नावाचा व्यक्ती बँकेत काम करत नसल्याची माहिती मिळाल्याने तिच्या पायाखालची जमीन सरकली. 

Web Title: Sub Golmaal Hai ... no PIN, no OTP ... anyway their 'accounts' are empty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.