शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

काय ही दुर्बुद्धी! नववीच्या विद्यार्थ्याला PUBG जिंकता येईना; आयुष्यच संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 17:35 IST

गोपाळगंज केंद्रीय विद्यालयातील नववी इयत्तेत शिकणारा विद्यार्थी हिमांशु कुमार याने आत्महत्या केली.

ठळक मुद्देगोपाळगंज शहरातील राजेंद्र नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिमांशूच्या खोलीत तो छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. गेममुळे वेळ वाया घालवतो आणि करिअर उद्ध्वस्त होत असल्याने पालकांनी त्याला दम भरला होता.

पटना - बिहारच्या गोपाळगंज जिल्ह्यातील एका १४ वर्षाच्या मुलाने शुक्रवारी सकाळी PUBG या ऑनलाईन गेम खेळल्याबद्दल त्याच्या कुटुंबियांनी दम भरल्यानंतर आत्महत्या केली. पोलिसांनी सांगितले की, गोपाळगंज केंद्रीय विद्यालयातील नववी इयत्तेत शिकणारा विद्यार्थी हिमांशु कुमार याने आत्महत्या केली. गोपाळगंज शहरातील राजेंद्र नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिमांशूच्या खोलीत तो छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता.

रावेतमध्ये मोबाईलवरील पबजी खेळामुळे तरुणाचा मृत्यू 

पबजी गेमच्या व्यसनापायी पुजाऱ्याने चोरल्या ३१ सायकली

गेम हरल्याने निराशपीडितच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले की, हिमांशु शुक्रवारी दुपारी एक वाजेपर्यंत ऑनलाइन गेम खेळताना दिसला. हा गेम वारंवार हरल्यामुळे तो खूप अस्वस्थ झाला आणि नंतर पालकांनी त्याला फटकारले. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, "मुलाने हताश झाल्याने इतके मोठे पाऊल उचलले असे दिसते." खोलीतून कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही.चौकशीसाठी फॉरेन्सिक तज्ञांचा मदत घेतली जात आहेएसएचओ प्रशांत कुमार राय यांनी सांगितले की, कुटुंबातील परिस्थिती सामान्य झाल्यानंतर हिमांशूचे वडील पप्पू कुमार यांची चौकशी करणार आहोत. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूचा (यूडी) गुन्हा दाखल केला आहे. एसएचओ म्हणाले, एफएसएलच्या पथकाने  नमुने गोळा केले. स्थानिक पोलिसांनी सांगितले की, हिमांशुला ऑनलाईन गेमची सवय होती आणि त्या गेममुळे वेळ वाया घालवतो आणि करिअर उद्ध्वस्त होत असल्याने पालकांनी त्याला दम भरला होता.मुलांच्या वागणुकीवर लक्ष ठेवाऑनलाईन गेम्समध्ये मुलांच्या व्यसनाधीनतेच्या घटनांमध्ये वाढ झाल्याबद्दल चिंता व्यक्त करताना मानववंशशास्त्रज्ञ प्रा. एस. नारायण म्हणाले, "पालकांनी त्यांच्या पाल्याच्या वागणुकीत होणाऱ्या बदलावर लक्ष केंद्रित केले पाहिजे." तथापि, पालकांकडे वेळ नसल्यामुळे आणि अतिरिक्त कामांमध्ये विद्यार्थ्यांना रस नसल्यामुळे मुलांना अमली पदार्थांच्या व्यसन लागते. या प्रकरणात वाढ झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याPUBG Gameपबजी गेमPoliceपोलिसStudentविद्यार्थी