शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अश्लिल मेसेज पाठवण्यास रोखले, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीला ऍसिडने आंघोळ घालण्याची दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 19:48 IST

Student threatened : पोलिसांनी आरोपी विद्यार्थी मोहम्मद इलियास याला अटक केली आहे.

उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनीला ऍसिड  हल्ल्याची धमकी मिळाली आहे. पीडित मुलगी अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे. विद्यार्थिनीला ही धमकी त्याच अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने दिली आहे. मोहम्मद इलियास असे आरोपी विद्यार्थ्याचे नाव असून तो अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. पोलिसांनी आरोपी विद्यार्थी मोहम्मद इलियास याला अटक केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?विद्यार्थिनीचा आरोप आहे की, तिच्या कॉलेजमधील एका विद्यार्थ्याने, मोहम्मद इलियासने तिला आधी अश्लील मेसेज पाठवले. इलियालने वाटेत अनेकवेळा विनयभंग करून तिचा छळ केला. यानंतर तो तिच्यावर जबरदस्तीने लग्न करण्यासाठी दबाव टाकू लागला. विद्यार्थिनीने विरोध केला असता इलियासने तिला अॅसिडने आंघोळ घालण्याची धमकी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद इलियास हा कानपूरच्या सिद्धार्थ नगर भागातील रहिवासी आहे. आरोपी विद्यार्थी आणि पीडित विद्यार्थिनी दोघेही अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाचे विद्यार्थी आहेत. दोघे एकाच कॉलेजमध्ये पण वेगवेगळ्या हॉस्टेलमध्ये राहतात.मोहम्मद इलियासच्या धमक्यांना घाबरलेल्या विद्यार्थिनीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सचेंडी पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवून आरोपी विद्यार्थ्याला मोहम्मद इलियासला अटक केली आहे. सीओ हृषिकेश यादव यांच्या म्हणण्यानुसार, इलियास या अभियांत्रिकी महाविद्यालयीन मुलाविरुद्ध अश्लील संदेश पाठवल्याबद्दल, विनयभंग आणि अॅसिडने आंघोळ करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आरोपीला अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशArrestअटक