शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक ओरडले म्हणून विद्यार्थिनीची आत्महत्या; सायन-कोळीवाडा परिसरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 02:16 IST

शाळेत दोन दिवस गैरहजर राहिल्याने शिक्षक ओरडले. वर्गात सर्वांसमोर अपमान झाला, या रागात सहावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सायन-कोळीवाडा परिसरात घडली.

मुंबई : शाळेत दोन दिवस गैरहजर राहिल्याने शिक्षक ओरडले. वर्गात सर्वांसमोर अपमान झाला, या रागात सहावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सायन-कोळीवाडा परिसरात घडली. या प्रकरणी वडाळा टी. टी. पोलीस अधिक तपास करत आहेत.सायन कोळीवाडामध्ये जुली महेंद्र शर्मा (१३) कुटुंबीयांसोबत राहायची. येथील क. दा. गायकवाड पालिका शाळेत ती सहावीच्या वर्गात शिकत होती. गेले दोन दिवस शाळेत गैरहजर राहिल्याने, शनिवारी शिक्षक अनिल पाल यांनी तिला अनुपस्थितीचे कारण विचारले. त्यात तिचा अभ्यासही अपूर्ण होता. वर्गात सर्वांसमोर शिक्षक ओरडल्याने तिने रडत रडत घर गाठले.याबाबत घरच्यांना सांगून तिने पोटमाळ्यावर स्वत:ला कोंडून घेतले. रात्रीच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. ती बराच वेळ बाहेर न आल्याने घरच्यांनी पोटमाळा गाठला. तिला आवाज दिला. मात्र, आतून काहीच प्रतिसाद न आल्याने त्यांनी दरवाजा तोडला. तेव्हा जुली गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.तिला रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे शर्मा कुटुंबीयांना धक्का बसला आहे. प्राथमिक तपासात शिक्षक सर्वांसमोर ओरडले, म्हणून जुलीने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती वडाळा टी. टी. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश काटकर यांनी दिली.

टॅग्स :Suicideआत्महत्याMumbaiमुंबई