महिलेच्या 'व्हाॅट्सअप'वर अनोळखी व्यक्तीचा ‘विवस्त्र काॅल’

By दत्ता यादव | Updated: March 4, 2023 21:10 IST2023-03-04T21:10:04+5:302023-03-04T21:10:45+5:30

भयभीत झालेल्या महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात घेतली धाव

Stranger's 'naked call' on woman's WhatsApp | महिलेच्या 'व्हाॅट्सअप'वर अनोळखी व्यक्तीचा ‘विवस्त्र काॅल’

महिलेच्या 'व्हाॅट्सअप'वर अनोळखी व्यक्तीचा ‘विवस्त्र काॅल’

दत्ता यादव, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: शहराच्या उपनगरात राहणाऱ्या एका ३१ वर्षीय महिलेच्या व्हाॅट्सअपवर एका अनोळखी व्यक्तीने विवस्त्र काॅल करून भलतीच मागणी केली. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन ज्या मोबाइलवरून व्हिडीओ काॅल आला होता, तो मोबाइल नंबर पोलिसांना दिला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिलेला २७ फेब्रुवारी रोजी एका अनोळखी मोबाइल नंबरवरून व्हाॅट्सअँपवर व्हिडीओ काॅल आला. समोरची व्यक्ती पूर्णपणे विवस्त्र झाली. त्यानंतर त्या व्यक्तीने अश्लील हावभाव करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून संबंधित महिला भयभीत झाली. एवढ्यावरच न थांबता त्या व्यक्तीने पीडित महिलेकडे शरीर सुखाचीही मागणी केली. दुसऱ्या दिवशी सकाळी पीडित महिलेने हा प्रकार घरातल्यांना सांगितला.

कुटुंबामध्ये विचारविनिमय झाल्यानंतर ३ मार्च रोजी सायंकाळी सात वाजता पीडित महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ज्या मोबाइल नंबरवरून पीडितेला व्हिडीओ काॅल आला होता. त्या नंबरवरून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर हे अधिक तपास करीत आहेत.   

Web Title: Stranger's 'naked call' on woman's WhatsApp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.