विचित्र घटना! मॉडर्न बाईकवर बसण्यास मनाई केली; तरुणीने भररस्त्यात तरुणाला लाथा घातल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 19:57 IST2024-03-01T19:54:16+5:302024-03-01T19:57:43+5:30
तरुणीने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि नंतर बाईकही ढकलून दिली.

विचित्र घटना! मॉडर्न बाईकवर बसण्यास मनाई केली; तरुणीने भररस्त्यात तरुणाला लाथा घातल्या
गुजरातमधील बडोदा इथं एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील एक तरुणी रस्त्यावर उभ्या असणाऱ्या मॉडर्न बाईकवर बसण्यासाठी हट्टाला पेटली होती. मात्र सदर बाईकचा मालक असणाऱ्या तरुणाने तिला बाईकवर बसण्यास मनाई केली. त्यानंतर चिडलेल्या तरुणीने बाईकमालकाची कॉलर पकडत त्याला लाथा घालण्यास सुरुवात केली.
मिळालेल्या माहितीनुसार, बडोदा शहरातील सयाजी गंज इथं ही घटना घडली आहे. एका तरुणीने रस्त्यावर उभी असलेली मॉडर्न बाईक बघितली. त्यानंतर तिची बाईकवर बसण्याची इच्छा झाली. ही गोष्ट तिने बाईकचा मालक असलेल्या तरुणाला सांगितली. मात्र त्याने मनाई केली. त्यानंतर तरुणीने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसंच बाईकही ढकलून दिली.
रस्त्यावर सुरू असलेला हा राडा बघण्यासाठी आजूबाजूच्या नागरिकांनी मोठी गर्दी केली. मात्र कोणीही भांडण सोडवण्यासाठी पुढे आलं नाही. अखेर बाईकमालक असेलल्या तरुणाने पोलीस ठाण्यात धाव घेत तरुणीविरुद्ध तक्रार दिली आहे.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई केली जात आहे.