शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

कुत्र्याला मारण्यापासून रोखले, संतापलेल्या माथेफिरुने ९ महिन्यांच्या मुलीचा घेतला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 20:02 IST

संतप्त झालेल्या युवकाने मुलीच्या डोक्यावर काठीने मारहाण केली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने चिमुकलीला झाशी येथे उपचारासाठी नेण्यात आले, पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी तरूणाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देतेथे आदिवासी व्यक्तीने त्या युवकाला कुत्र्याला ठार मारण्यापासून रोखलं आणि त्या दोघांमध्ये वाद झाला. वादातून तरूणाने रागाने नऊ महिन्यांच्या शालिनीची हत्या केली. निष्पाप मुलीला जिल्हा रुग्णालयातून झांसी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात येत होते. पण वाटेतच चिमुकलीचा मृत्यू झाला.

टीकमगड - मध्य प्रदेशातील टीकमगड जिल्ह्यातील जतारा पोलीस ठाण्यांतर्गत चंद्रपुरा गावात कुत्र्यास मारण्यास रोखल्याने एका युवकाने राग अनावर झाल्याने ९ महिन्यांच्या निरापराध मुलीची हत्या केली. संतप्त झालेल्या युवकाने मुलीच्या डोक्यावर काठीने मारहाण केली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने चिमुकलीला झाशी येथे उपचारासाठी नेण्यात आले, पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी तरूणाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.स्टेशन प्रभारी रश्मी जैन यांनी सांगितले की, शनिवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास तरुण ब्रिजेंद्र, (दयाराम घोष यांचा मुलगा) हा रस्त्याने चालत होता, तेव्हा कुत्र्याने त्याच्याकडे पाहून भुंकले. त्या कुत्र्याचा पाठलाग करुन तरूण गावाच्या आदिवासी भागात पोहोचला. तेथे आदिवासी व्यक्तीने त्या युवकाला कुत्र्याला ठार मारण्यापासून रोखलं आणि त्या दोघांमध्ये वाद झाला. वादातून तरूणाने रागाने नऊ महिन्यांच्या शालिनीची हत्या केली.चिमुकल्या शालिनीच्या डोक्याला दुखापत झाली होती आणि तिला गंभीर अवस्थेत जतारा सामुदायिक आरोग्य केंद्रात आणले होते. येथे प्राथमिक उपचारानंतर मुलीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले गेले. निष्पाप मुलीला जिल्हा रुग्णालयातून झांसी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात येत होते. पण वाटेतच चिमुकलीचा मृत्यू झाला.चिमुकली शालिनी ही तिची आई लीलासमवेत ढेवरा गावातल्या तिच्या मावशीच्या चंद्रपुरा गावात एका विवाह सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी आली होती. मुलीचे कुटुंबीय मुलीचा मृतदेह घेऊन पोलिसांपर्यंत पोहोचले आणि जतारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आरोपी बृजेंद्र घोष (रहिवासी चंद्रपुरा) याच्याविरोधात कलम ३०२, २३४ नुसार एससी-एसटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

 

नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न

 

सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी 'ईगल'वर फसवणुकीचा गुन्हा दाखल

 

थरारक! घरासमोर जाऊन टोळक्याने गुंडाची चाकू भोसकून हत्या 

 

TikTok स्टार शिवानीचा गळा दाबून खून; बेडच्या आत मिळाला मृतदेह

 

जे. जे. रुग्णालयात डॉक्टरचा वॉर्डबॉयने केला विनयभंग; पोलिसांनी केली अटक

 

मृत्यूशी झुंज देतेय! आजीच्या कुशीत झोपलेली नात; मामाच्या वासनेला बळी पडली

 

खळबळ! कोठडीत पिता-पुत्राच्या मृत्यूनंतर आता पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेश