परतूर येथील तरुणाचा पूर्णा परिसरात दगडाने ठेचून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 19:52 IST2018-08-04T19:51:20+5:302018-08-04T19:52:23+5:30
पूर्णा ते अकोला लोहमार्गावरील आडगाव शिवारात एका 29 वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

परतूर येथील तरुणाचा पूर्णा परिसरात दगडाने ठेचून खून
पूर्णा (परभणी) : पूर्णा ते अकोला लोहमार्गावरील आडगाव शिवारात एका 29 वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. पोलीस तपासात मृतदेह सीताराम शेषेराव यादव याचा असून तो परतूर तालुक्यातील वैजोडा येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले.
पूर्णा पोलिसांनि दिलेल्या माहिती नुसार, आज सकाळी पूर्णा अकोला लोहमार्गावर एकाचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडल्याची सकाळी माहिती मिळताच पूर्णा पोलीस ठाण्याचे स पो नि चंद्रकांत पवार, फौजदार गणेश राठोड जमादार कोठेंकर ,पो का शेखर कळवले, दत्ता काकडे आदींनी घटनास्थळी भेट दिली.
यानंतर परभणी येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्वा पानसरे, पोनि सुनील ओव्हाळ यांनी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांसह घटनास्थळी भेट दिली. मृताच्या आधार कार्डावरून तो परतूर तालुक्यातील वैजोडा येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी मृताचे काका विठ्ठल दादाराव यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे