शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव शिवारातील विहिरीत आढळल्या चोरीच्या दुचाकी, संशयित आरोपीकडून चोरीचा उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 17:12 IST

वेगवेगळ्या भागांतून दुचाक्या लंपास करणारी टोळी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. दुचाकीचे स्पेअरपार्ट काढून चोरटे त्या विहिरीत फेकत होते.

अनिल उंबरकर -

शेगाव : शेगाव-वरवट मार्गावरील एका विहिरीत चोरीच्या दुचाकी टाकून दिल्याचा उलगडा संशयित आरोपीकडून करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. विहिरीतून मंगळवारी दुपारपर्यंत १५ दुचाकी बाहेर काढण्यात आल्या. त्याचप्रमाणे शेगाव परिसरातील आणखी काही विहिरीमध्ये दुचाकी असल्याचा संशय असल्याने शोध घेणे सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांनी दिली. शहरातील विविध शासकीय कार्यालय, हॉस्पिटल व इतरही सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणाहून दुचाकी चोरून नेण्याच्या घटनेत वाढ झाली आहे.

वेगवेगळ्या भागांतून दुचाक्या लंपास करणारी टोळी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. दुचाकीचे स्पेअरपार्ट काढून चोरटे त्या विहिरीत फेकत होते. शेगाव रस्त्यावर विहिरीतून पोलिसांनी दुचाकी काढणे सुरू केले आहे. दुचाकी चोरणारी टोळीच बुलढाणा जिल्ह्यात सक्रिय होती. दरम्यान, पोलिसांनी शेगाव येथील ईदगाह प्लॉट परिसरात राहणाऱ्या सय्यद वसिम सय्यद इस्लाम (३८) याला ताब्यात घेत चौकशी केली. या वेळी सय्यद वसिम याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर पोलिसी हिसका दाखवला असता सय्यद वसिमने गुन्ह्याची कबुली दिली. काही दुचाक्यांची मोडतोड केली असल्याचीही माहिती दिली. त्याच्यासोबत आणखी काही जण या टोळीत असून, पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही टोळी दुचाकीचे वेगवेगळे पार्ट करून नंतर दुचाकी विहिरीत टाकत होते. चोरट्यांनी दिलेल्या माहितीच्या शेगाव ते वरवट बकाल रस्त्यावर एका शेतातील विहिरीतून पोलिसांनी दुचाकी काढणे सुरू केले आहे. उपविभागीय अधिकारी अमोल कोळी यांच्यासह खामगाव आणि शेगाव येथील पोलीस पथक घटनास्थळी दुचाकींचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtwo wheelerटू व्हीलर