शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 16:29 IST

पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत नराधम आरोपीला अटक केली.

नात्यांना काळिमा फासणारी एक अत्यंत क्रूर घटना बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातून समोर आली आहे. बरारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सावत्र बापाने आपल्या अल्पवयीन मुलीवर सलग सहा महिने बलात्कार केल्याचा धक्कादायक गुन्हा उघड झाला आहे. पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत नराधम आरोपीला अटक केली असून, महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलीची हृदयद्रावक कहाणीपीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, "माझा सावत्र बाप गेल्या सहा महिन्यांपासून माझ्यावर लैंगिक अत्याचार करत आहे. मला चाकूचा धाक दाखवून तो वारंवार बलात्कार करत होता. याबद्दल कोणाला काही सांगितले, तर माझ्या आईला जीवे मारण्याची धमकी देत होता."

भीतीपोटी मुलगी गप्प राहिली. मात्र, एका आठवड्यापूर्वी तिची तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले. सोनोग्राफी तपासणीत ती दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तिने आपल्या आईला सावत्र वडिलांच्या या क्रूर कृत्याची संपूर्ण हकीकत सांगितली.

आईची तक्रार आणि पोलिसांची तत्पर कारवाईपीडितेच्या आईने पोलिसांना सांगितले की, "माझ्या पहिल्या पतीचे १४ वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर मी दुसरे लग्न केले. मला या पतीपासून पाच वर्षांची आणखी एक मुलगी आहे." आपल्या मुलीच्या तब्येतीबाबत कळताच, आईने तात्काळ महिला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपी सावत्र बापाला अटक केली आहे.

भागलपूरचे एसपी सिटी शुभंक मिश्रा यांनी सांगितले की, "या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, आरोपीला मंगळवारी तुरुंगात पाठवण्यात येणार आहे." या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारUttar Pradeshउत्तर प्रदेश