भिवंडीत बापलेकीच्या नात्याला काळिमा; सावत्र बापाचा दहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

By नितीन पंडित | Updated: December 27, 2023 14:20 IST2023-12-27T14:20:47+5:302023-12-27T14:20:54+5:30

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला. यावेळी

Step father sexually abused 10-year-old girl in Bhiwandi, police arrested | भिवंडीत बापलेकीच्या नात्याला काळिमा; सावत्र बापाचा दहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

भिवंडीत बापलेकीच्या नात्याला काळिमा; सावत्र बापाचा दहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

भिवंडी:  २४ वर्षीय सावत्र बापाने १० वर्षीय अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी समोर आली आहे.या घटनेने नराधम सावत्र बापाने बाप लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासला आहे.याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने नराधमा विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी नाराधमास अटक केली आहे.

तालुका पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटने प्रकरणी सुरुवातीला २४ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला. यावेळी सावत्र बापाने ३ अज्ञातांनी मुलीला गाडीत टाकून तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावच्या डोंगरावर नेवून तिच्यावर अतिप्रसंग करून तिला घरी आणून सोडल्याची बनावट बतावणी केली होती.

त्यानंतर उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले आणि तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणवीर बयेस यांनी गणेशपुरी पोलिसांच्या मदतीने ६ पोलीस पथके तयार करून तांत्रिक विश्लेषणाद्वारे कसून तपास सुरू केला. त्यावेळी पोलिसांनी अल्पवयीन पीडित मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर नराधम सावत्र बापानेच अत्याचार केल्याचे पीडितेने कथन केले.
        पोलिसांनी सावत्र बापाची कसून चौकशी केल्यानंतर नराधम सावत्र बापाने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी २५ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास २४ वर्षीय नराधम बापाला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात विविध कलमान्वये तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मंगळवारी त्यास न्यायालयात हजर केले असता २ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेने परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title: Step father sexually abused 10-year-old girl in Bhiwandi, police arrested