शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

नागपूरात मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणारे गजाआड! कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णांचे दागिने चोरत होते 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 00:39 IST

Crime News : गोधनी येथील रहिवासी अंजली गिरजाप्रसाद तिवारी यांच्या वडिलांचा १ एप्रिलला इस्पितळात कोरोनामुळे मृत्यू झाला होता.  त्यावेळी दुःखवियोगामुळे तिवारी यांच्या जवळचा मोबाईल चोरीला गेल्याचे त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आले नाही.

नागपूर : कोरोनामुळे दगावलेल्या व्यक्तीच्या अंगावरचे दागिने आणि मौल्यवान चिजवस्तू लंपास करणाऱ्या दोन नराधमांना तहसील पोलिसांनी अटक केली. गणेश उत्तम डेकाटे (वय २४, रा. पार्वती नगर, कळमना) आणि छत्रपाल किशोर सोनकुसरे (वय २५, जुनी मंगळवारी, ढिवर मोहल्ला, लकडगंज) अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी सोन्याचे दागिने,रोख रक्कम, मोबाईल दुचाक्या आणि अन्य चीजवस्तू असा एकूण तीन लाख, ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गोधनी येथील रहिवासी अंजली गिरजाप्रसाद तिवारी यांच्या वडिलांचा १ एप्रिलला इस्पितळात कोरोनामुळे मृत्यू झाला होता.  त्यावेळी दुःखवियोगामुळे तिवारी यांच्या जवळचा मोबाईल चोरीला गेल्याचे त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आले नाही. नंतर मात्र वडिलांचा मोबाइल चोरीला गेल्याचे लक्षात आल्याने अंजली यांनी सोमवारी (१७ मे) तहसील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार जयेश भांडारकर यांनी गुन्हा दाखल करून तातडीने चौकशी सुरू केली. 

गुन्हा घडून दीड महिना झाला होता. त्यामुळे आरोपीं बिनधास्त होते. त्यांनी मृत तिवारी यांच्या मोबाईलचा वापर सुरु केला होता. त्याचे लोकेशन कुही परिसरात दिसल्याने तहसील पोलिसांनी आरोपी डेकाटे आणि सोनकुसरे यांना सोमवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोबाईल जप्त केल्यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली असता पोलीस चक्रावलेच. आरोपींकडे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक मोबाईल, सोन्याचे दागिने, रोकड, आठ लेडीज घड्याळ तसेच रुग्णालयात वापरले जाणारे साहित्य आढळले. त्यामुळे पोलिसांची शंका बळावली. 

डेकाटे आणि सोनकुसरे उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांनी त्यांना बाजीरावचा हिसका दाखवला. त्यातून धक्कादायक माहिती पुढे आली. आरोपी डेकाटे आणि सोनकुसरे हे कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीचे मृतदेह रुग्णालयात प्लास्टिक किटमध्ये पॅक करण्याचे काम करायचे. मृतदेह ताब्यात येताच हे दोघे सोन्याचा गोफ, अंगठी, नथणी, डोरले असे दागिने तसेच मोबाईल, रोख रक्कम काढून घेत होते. त्यानंतर मृतदेह स्मशानात रवाना केला जायचा. संबंधित व्यक्तीचे नातेवाईक शोकमग्न असल्यामुळे या नराधमांचे कुकृत्य कुणाच्या लक्षात येत नव्हते. त्यामुळे ते मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम करत होते. त्यांनी अशा प्रकारे सात व्यक्तींचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम, हात घड्याळ चोरले होते.

कोरोना किटही चोरलीहे दोघे रुग्णालयातील कोरोना किट तसेच अन्य साहित्याचीही चोरी करायचे. त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण तीन लाख, ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अशा प्रकारची नागपुरातील अलीकडची ही पहिलीच कारवाई असून अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त लोहित मतानी आणि एसीपी थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार जयेश भांडारकर, द्वितीय निरीक्षक बलरामसिंग परदेसी, यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील वाघ तसेच कर्मचारी लक्ष्मण शेंडे, शैलेश दाबोले, किशोर गरवारे, नजीर शेख, शंभूसिंग किरार, पंकज डबरे, यशवंत डोंगरे, कृष्णा चव्हाण, गगन यादव आणि अश्विनी यांनी ही कामगिरी बजावली. उद्या मिळविणार कस्टडीया नराधमांना बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार असून पोलीस त्यांचा कस्टडी रिमांड मिळवणार आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तविली 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसnagpurनागपूर