शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्य उत्पादन शुल्कचा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 11:04 IST

Bribe case : लाच घेताना दोघांना अटक : तब्बल ६ वेळा केली पडताळणी

पुणे : नोकरनामा देण्यासाठी दर महा ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकाला खासगी व्यक्तीसह लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. आनंद दत्तात्रय काजळे (वय ३९) दुय्यम निरीक्षक आणि खासगी व्यक्ती गणेश राजेंद्र परीट (वय ३३, रा. हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.तक्रारदार यांनी दुय्यम निरीक्षक आनंद काजळे यांच्याकडे नोकरनामा मिळवण्यासाठी अर्ज दिला होता. त्यावेळी काजळे याने त्यांच्याकडे चार महिन्यांचे २० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सर्वप्रथम १४ ऑक्टोबर रोजी त्याची पडताळणी केली होती. त्यानंतर ३, ४, ६, ९ व १० नोव्हेंबर रोजी पडताळणी करण्यात आली. यावेळी त्यांनी तडजोड करुन ७ हजा रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यावरुन लाचलुपचत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सापळा आयोजित केला. तक्रारदाराकडून खासगी कारमध्ये बसून गणेश परीटमार्फत ७ हजार रुपये स्वीकारताना पकडण्यात आले. त्यांच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

स्वत: पैसे घेण्यास नव्हता तयारआनंद काजळे हा आपल्यावर कारवाई होऊ नये, म्हणून खूप काळजी घेत होता. प्रत्येक वेळी तक्रारदाराला बोलावून त्याच्याशी चर्चा करीत. त्यानंतर तुम्हाला कोणाकडे पैसे द्यायचे हे सांगतो, असे म्हणत होता. असे तब्बल ६ वेळा झाले. त्याचा नेहमीचा खासगी वाहनचालक बाहेर गेला असल्याने गेल्या २ दिवसापासून त्याने परीट याला चालक म्हणून बरोबर घेतले होते. काजळे कारमध्ये बसल्यावर तक्रारदार त्याच्याकडे पैसे देण्यास गेल्यावर त्याने ते चालकाकडे देण्यास सांगितले. तक्रारदाराने पैसे दिल्यावर लाचलुचपतच्या अधिकार्यांनी तातडीने चालकाला आम्ही एसीबीचे लोक आहोत, असे सांगितले. त्याबरोबर चालकाने गाडी थांबविली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले.

राज्य उत्पादन शुल्कचा निरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागExcise Departmentउत्पादन शुल्क विभागArrestअटकPuneपुणे