शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

स्टेट बँकेचे कॉलसेंटर नंबर निघाले बोगस, ग्राहकाला साडेनऊ लाखांचा गंडा, गुगलची घेतली होती मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 09:14 IST

Crime News: स्टेट बँकेच्या एका ग्राहकाने मोबाइल ॲप सुरू होत नसल्याची तक्रार करण्यासाठी गुगलवर या बँकेचा कॉल सेंटर नंबर मिळवला. मात्र, गुगलवर शोधलेला हा कॉल सेंटरचा नंबर बोगस निघाला

बदलापूर : स्टेट बँकेच्या एका ग्राहकाने मोबाइल ॲप सुरू होत नसल्याची तक्रार करण्यासाठी गुगलवर या बँकेचा कॉल सेंटर नंबर मिळवला. मात्र, गुगलवर शोधलेला हा कॉल सेंटरचा नंबर बोगस निघाला असून याच नंबरवरून बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून तब्बल साडेनऊ लाख रुपयांना लुबाडण्याचा प्रकार बदलापुरात उघड झाला आहे. बदलापूर रमेश वाडी परिसरात राहणारे विक्रमसिंग ऐरी (५३) हे मोबाइलमध्ये स्टेस्ट बँक ऑफ इंडियाचे योनो ॲप ओपन होत नसल्याने गुगलवर सर्च करून बँक ऑफ इंडियाचा कस्टमर सर्व्हिस सेंटरचा मोबाइल नंबर मिळवला. या नंबरवरून संपर्क साधला असता समोरून बोलणाऱ्या इसमाने आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कस्टमर सर्व्हिस सेंटरमधून बोलत असल्याची बतावणी केली. विक्रमसिंग यांनी त्याला समस्या सांगितली. त्यावर त्याने सांगितल्याप्रमाणे विक्रमसिंग यांनी मोबाइलमध्ये एनी डेस्क नावाचे ॲप डाउनलोड केले. त्यावर बँक व डेबिट कार्डची संपूर्ण माहिती भरली. पासवर्ड आणि युजर आयडी चेंज करून मोबाइलवर आलेला ओटीपी नंबरही ॲपमध्ये भरला. त्यानंतर २४ तासांत पासवर्ड आणि युजर आयडी चेंज झाल्याचा मेसेज येईल, असे सांगून भामट्याने फोन कट केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी विक्रमसिंग यांना तसा मेसेजही आला. त्यामुळे  ते बँकेत गेले असता त्यांच्या खात्यातून ९ लाख ५३ हजार ३६३ रुपये दुसरीकडे ट्रान्स्फर झाले होते.

विक्रमसिंग यांच्या खात्यात दुसराच नंबरविक्रमसिंग यांच्या खात्यात दुसरा नंबर ॲड झाला होता. त्या व्यक्तीने इंटरनेटद्वारे आपली फसवणूक केल्याचे विक्रमसिंग यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेतली. बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक अंकुश मस्के तपास करीत आहेत.

रजिस्टर नंबर बदलून हाेते फसवणूक बँकेच्या व्यवहारात काही समस्या आल्यास गूगलवर जाऊन कॉल सेंटरचा नंबर मिळविण्याचा प्रयत्न केला जाताे. असे न करता बॅंकेच्या ऑफिशियल वेबसाइटवरूनच कॉल सेंटरचा नंबर मिळणे गरजेचे आहे. कारण गूगलवर बँकेच्या नावाने कॉल सेंटर नंबर तयार करून त्याद्वारे ग्राहकांची फसवणूक करण्याचा नवीन फंडा शोधून काढण्यात आला आहे. बोगस नंबरवर कॉल केल्यानंतर ग्राहकाला विश्वासात घेऊन त्याच्या मोबाइलमध्ये एनी डेस्क नावाचे ॲप डाऊनलोड करून ग्राहकाच्या मोबाइलचा ताबा घेतला जाताे. त्यानंतर अकाैंट डिटेल्सच्या आधाराने बँक खात्यात ग्राहकाचा नंबर काढून तेथे स्वतःचा मोबाइल नंबर अपडेट करून रक्कम वळती केली जाते.डेबिट कार्डच्या डिटेल्सद्वारे बँकेत असलेला ग्राहकाचा मोबाइल नंबर बदलला जातो. त्यामुळे पैसे काढताना येणारे ओटीपी हे बदललेल्या मोबाइल नंबरवर येतात. त्यामुळे बँक खातेधारकाला पैसे हस्तांतरणाचा सुगावा लागत नसल्याने सायबर गुन्हेगारांचे काम साेपे हाेते. यामुळे ग्राहकांनी सावध रहावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbadlapurबदलापूरState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडिया