देहूफाटा स्थानकात उभी असलेली एसटी बस अज्ञातांनी पेटविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 16:49 IST2019-04-23T16:21:27+5:302019-04-23T16:49:42+5:30
बसस्थानकात उभी असलेली बस अज्ञात व्यक्तींनी पेटविली. यामध्ये बसचे १५ लाखांचे नुकसान झाले..

देहूफाटा स्थानकात उभी असलेली एसटी बस अज्ञातांनी पेटविली
पिंपरी : बसस्थानकात उभी असलेली बस अज्ञात व्यक्तींनी पेटविली. यामध्ये बसचे १५ लाखांचे नुकसान झाले. ही घटना आळंदीतील देहूफाटा येथील बसस्थानकात घडली. याप्रकरणी शिवाजीनगर एसटी आगाराचे व्यवस्थापक अनिल निवृत्ती भिसे (वय ५२, रा. बीटी कवडे रोड, मुंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (१८ मार्च) पहाटे अडीचच्या सुमारास नांदेड विभागाची कंधार आगाराची एसटी बस (एमएच २०, बीएल ३७१९) ही आळंदी बस स्थानकात उभी होती. दरम्यान, अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणाने या बसला पाठीमागील बाजूने आग लावली. यामध्ये बसचे अंदाजे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी भिसे यांनी तक्रार दिल्यानंतर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधिक तपास करीत आहेत.