SSR Case : रियाने शेजारणीविरोधात पत्र लिहून केली सीबीआयला तक्रार 

By पूनम अपराज | Published: October 12, 2020 09:05 PM2020-10-12T21:05:58+5:302020-10-12T21:06:28+5:30

SSR Case : या तक्रारीत रिपब्लिक टीव्हीचेही नाव आहे, याबाबत माहिती रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली आहे. 

SSR Case: Rhea writes letter against neighbour and lodges complaint with CBI | SSR Case : रियाने शेजारणीविरोधात पत्र लिहून केली सीबीआयला तक्रार 

SSR Case : रियाने शेजारणीविरोधात पत्र लिहून केली सीबीआयला तक्रार 

googlenewsNext
ठळक मुद्देरियाच्या शेजारी असलेल्या डिंपलने असा दावा केला होता की, 13 जूनच्या रात्री सुशांत सिंग राजपूत रिया सोडण्यासाठी तिच्या इमारतीत आला होता.

सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन संदर्भात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक झाली होती. आता रिया जामिनावर जेलबाहेर आली आहे. आता अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने तिची शेजारी डिंपल थवाणी हिच्याविरूद्ध सीबीआयकडे लेखी तक्रार केली आहे. रिया हिने डिंपलविरोधात कारवाई करण्याची मागणी सीबीआयला केली आहे. रिया म्हणाली आहे की, तिच्यावर खोटे आणि बनावट आरोप लावण्यात आले होते. या तक्रारीत रिपब्लिक टीव्हीचेही नाव आहे, याबाबत माहिती रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली आहे. 


रियाच्या शेजारी असलेल्या डिंपलने असा दावा केला होता की, 13 जूनच्या रात्री सुशांत सिंग राजपूत रिया सोडण्यासाठी तिच्या इमारतीत आला होता. 14 जून रोजी सुशांत सिंग राजपूत मुंबईच्या वांद्रे येथे एका घरात मृतावस्थेत आढळला. सुशांत मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशी करीत आहे. सीबीआय चौकशीत डिंपल हे आरोप सिद्ध करू शकले नाहीत असा अनेक माध्यमांच्या वृत्तांत दावा केला गेला आहे.


अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्स प्रकरणात अटक झालेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांना मुंबई उच्च न्यायालयाने 7 ऑक्टोबरला जामीन मंजूर केला होता. त्यानंतर हायकोर्टाने म्हटले आहे की, "रिया ड्रग्ज विक्रेत्यांचा भाग नाही." तिने विकत घेतलेले ड्रग्ज पैशासाठी किंवा इतर कोणत्याही लाभासाठी दुसऱ्याला दिली नाही."

Web Title: SSR Case: Rhea writes letter against neighbour and lodges complaint with CBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.