शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव डंपरने तिघांना उडवले; दोघांचा झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 16:59 IST

याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी डंबर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून डंपरचालकाला अटक केली आहे.  

ठळक मुद्देया प्रकरणानंतर स्थानिक नागरिकांना आक्रमक पावित्रा धारण करत रस्ता बंद केला. पायी चालत जाणाऱ्या संजय सखाराम पवार (५९) आणि अज्ञात इसमाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने ना. म. जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई - लोअर परेल परिसरातील डिलाईल रोड येथे भीषण अपघात घडला आहे. सोमवारी रात्री ११.२० वाजताच्या सुमारास भरधाव डंबरने (एमएच ४३, बीपी ६००१) तिघांना चिरडले. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. डिलाईल रोड येथील बावला मशीदसमोर लोअर परेल मोनोरेल स्टेशन ब्रिज खाली ही घटना घडली आहे. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी डंबर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून डंपरचालकाला अटक केली आहे.  या प्रकरणानंतर स्थानिक नागरिकांना आक्रमक पावित्रा धारण करत रस्ता बंद केला. रात्री 11 नंतर अनेक मोठेमोठे डंपर या रस्त्यावरुन जातात. हे डंपर चालवणारे अनेक ड्रायव्हर हे नशेत असतात असं येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. दरम्यान पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली आहे. हा चालक नक्की नशेत होता का? याबाबत पोलीस तपास सुरु आहे. पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली असून त्यातून तो दारूच्या नशेत होता का ? स्पष्ट होईल. 

चालकाने त्याच्या ताब्यातील डंपर हा हयगयीने व  निष्काळजीपणे चालवून रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या संजय सखाराम पवार (५९) आणि अज्ञात इसमाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने ना. म. जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवार हे कल्याण येथे राहणारे असून अंदाजे ५० वर्षीय मृत इसमाची ओळख अद्याप पटलेली नाही. तर तिसऱ्या जखमीवर नायर रुग्णालयात उपचार सुरु आहे. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूMumbaiमुंबईPoliceपोलिसArrestअटक