शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सिरियल रेपिस्टच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक तयार करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 21:12 IST

मीरा रोड येथे राहणाऱ्या रेहमत कुरेशी या विकृताने २०१६ पासून अल्पवयीन मुलींवर बलात्कार करत होता. नवी मुंबई, नालासोपारा आणि ठाण्याचे पोलीस त्याच्या मागावर होते. त्याला नुकतीच मीरा रोड येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर नवी मुंबई, ठाणे ग्रामीण, ठाणे, नालासोपारा मधील तुळींज आणि मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

मुंबई - वसईत अल्पवयीन मुलींना फूस लावून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणारा विकृत सिरियल रेपिस्ट रेहमत कुरेशी याने आतापर्यंत १७ मुलींवर बलात्कार केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याविरोधात नवी मुंबई, ठाणे, मुंबई आणि पालघरमधील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या सर्व गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक तयार  करण्यात येणार असून या पथकामार्फत पुढील तपास केला जाणार आहे. यामुळे आरोपी विरोधात भक्कम पुरावे गोळा करणे सोपे होणार आहे.

मीरा रोड येथे राहणाऱ्या रेहमत कुरेशी या विकृताने २०१६ पासून अल्पवयीन मुलींवर बलात्कार करत होता. नवी मुंबई, नालासोपारा आणि ठाण्याचे पोलीस त्याच्या मागावर होते. त्याला नुकतीच मीरा रोड येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर नवी मुंबई, ठाणे ग्रामीण, ठाणे, नालासोपारा मधील तुळींज आणि मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आतापर्यंत त्याने १७ अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची कबुली दिली आहे. याशिवाय अनेक मुलींचे त्याने लैंगिक शोषण केले आहे. परंतु, त्या मुलींच्या पालकांनी तक्रारी देण्यास नकार दिली आहे. त्याच्याविरोधात पुरावे गोळा कऱण्याचे काम सुरू आहे. या कामात सुसूत्रता यावी आणि अधिक भक्कम पुरावे गोळा करता यावे यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापन केली जाणार असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. नालासोपाऱ्याच्या तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याने १४, २० आणि २१ सप्टेंबर या दिवसात तीन गुन्हे केले होते. त्यापैकी दोन गुन्ह्यातील मुलींनी त्याच्या हातावर तुरी देऊन निसटण्यात यश मिळवले होते. रेहमत कुरेशीवर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायदा (पॉक्सो), विनयभंग आणि अपहरणाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. काही प्रकरणात त्याने मुलींचे अश्लिल छायाचित्रे काढली होती. त्यासाठी त्याचा मोबाइल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरारMumbaiमुंबईNavi Mumbaiनवी मुंबईpalgharपालघरSexual abuseलैंगिक शोषण