शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या लोकलमधून सोनसाखळी लंपास करणारा अट्टल चोरटा गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 16:55 IST

कल्याण लोहमार्ग पोलिसांची कारवाई; ८२ ग्रॅम ७०० मिली ग्रॅम चोरीचे दागिने केले हस्तगत

डोंबिवली - विशाखापट्टणम एक्स्प्रेसने प्रवास करणा-या एका प्रवाशाची ३९ ग्रॅम ७०० मिली ग्रॅम वजनाची सोनसाखळी धावत्यालोकलमधून गळयातून हिसकावून चोरल्याची घटना ऑगस्ट महिन्यात कल्याण रेल्वे स्थानकात घडली होती. ती चोरी करणारऱ्या अट्टल चोराला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गुरूवारी अटक केली असता त्याने ठाणे स्थानकातही यापूर्वी असा गुन्हा केला असल्याची उकल करण्यात आली.सम्राट अशोक शिंदे उर्फ संभा उर्फ सॅम (वय २४) असे या अट्टल चोराचे नाव असून तो कोळसेवाडी, कल्याण पूर्व, या ठिकाणी राहतो. धावत्या लोकल गाड्यांमधील प्रवाशांना लक्ष्य करत त्यांच्या बेसावधपणाचा अंदाज घेत तो असे कृत्य करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक दिनकर पिंगळे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी ऑगस्ट महिन्यापासून सापळा रचला होता. विशेषत: कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ६ व ७ या ठिकाणी त्यांनी पथक तैनात केले होते. त्यामध्ये महिला पोलिस निरिक्षक सुरेखा मेढे, पोलिस निरिक्षक अविनाश आंधळे, विकास भिंगारदिवे, गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस सहकारी आदींचा समावेश होता. त्यांनी रचलेल्या सापळयानुसार खबऱ्यांच्या माहितीवरून सांभा यास अटक करण्यात आली. त्यामध्ये त्याने विशाखापटटणम एक्स्प्रेसमधील प्रवाशाचे रेल्वे गाडी सुरू होताच सोनसाखळी हिसकावून पळ काढला होता. असे अनेकदा त्याने केले असल्याचे पोलीस चौकशीत निदर्शनास आले. त्यानुसार त्याची चौकशी केली असता ठाणे स्थानकातही अशी घटना केल्याचे त्याने कबुल केले. त्याच्याकडून कल्याण व ठाणे स्थानकातील चो-यांची उकल करण्यात आली. त्यासह अन्य गुन्ह्यांमधील एकूण ८२ ग्रॅम ७०० मिलीग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ३ हजार ६८० रूपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात आल्याची माहिती पिंगळे यांनी दिली. संभा यास अटक करण्यात आली असून कल्याण रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyदरोडाrailwayरेल्वेChain Snatchingसोनसाखळी चोरी