शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

सोनू सूदने केली २० कोटींची करचोरी; प्राप्तिकर खाते, बोगस संस्थांच्या माध्यमातून वळविला पैसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 07:44 IST

प्राप्तिकर विभागाच्या कारवाईनंतर शिवसेना आणि आम आदमी पार्टीने भाजपवर टीका केली हाेती. साेनू सूद याच्यासारख्यांवर अशा प्रकारचे छापे मारणे म्हणजे काेत्या मनाचे लक्षण असल्याचे शिवसनेने म्हटले हाेते.

नवी दिल्ली/मुंबई : काेराेना महामारीच्या काळात हजाराे स्थलांतरित मजुरांना मदत करणारा चित्रपट अभिनेता साेनू सूद याने २० काेटी रुपयांची करचाेरी केल्याचा आराेप प्राप्तिकर खात्याने केला आहे. साेनू सूद याच्या निवासस्थानासह मुंबई, लखनाै आणि दिल्लीतील कार्यालयांवर प्राप्तिकर खात्याने छापे मारले हाेते. त्यानंतर ही माहिती देण्यात आली आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) साेनू सूद याच्या लखनाै येथील औद्याेगिक क्लस्टरमधील कार्यालयांवर छापे मारले हाेते. हा समूह पायाभूत विकासाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. मुंबई, दिल्ली, लखनाै, कानपूरसह एकूण २८ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली हाेती. याबाबत सीबीडीटीने माहिती दिली आहे. छाप्यांमध्ये अनेक संशयास्पद आर्थिक व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे आढळून आली आहेत. त्यातून करचुकवेगिरी उघड झाल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे.

प्राप्तिकर विभागाच्या कारवाईनंतर शिवसेना आणि आम आदमी पार्टीने भाजपवर टीका केली हाेती. साेनू सूद याच्यासारख्यांवर अशा प्रकारचे छापे मारणे म्हणजे काेत्या मनाचे लक्षण असल्याचे शिवसनेने म्हटले हाेते. साेनू सूद याला ‘आप’ने त्याला दिल्ली सरकारच्या विद्यार्थी मार्गदर्शक कार्यक्रमाचा ब्रॅंड ॲम्बेसेडर बनविले हाेते.

एफसीआरए कायद्याचे उल्लंघनही केलेसाेनू सूदने बेहिशेबी पैसा बनावट संस्थांच्या माध्यमातून बाेगस कर्जाद्वारे पैसे वळविल्याचे आढळले आहे. तसेच एफसीआरए कायद्याचे उल्लंघन केल्याचाही आराेप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याने क्राउडफंडिंग प्लॅटफाॅर्मचा वापर करून परदेशी देणगीदारांकडून २.१ काेटी रुपये गाेळा केल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे. 

टॅग्स :Sonu Soodसोनू सूदIncome Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालयbollywoodबॉलिवूड