शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

सेक्स रॅकेट चालवणाऱ्या सोनू पंजाबनला कोर्टाने सुनावली २४ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 16:02 IST

सोनूला कोर्टाने नुकतीच २४ वर्षांची शिक्षा सुनावली असून तिचा त्याचा साथीदार संदीप बेनीवाल यालाही २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

ठळक मुद्देअपहरण, वेश्या व्यवसाय आणि अनैतिक तस्कर, ४ वर्ष अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांना देहविक्रीस भाग पडणे अशा आरोपांखाली तिला शिक्षा सुनावण्यात आली. २०११ साली पोलिसांच्या माहितीनुसार, तिच्याकडे अनेक हायप्रोफाईल देहविक्री करणाऱ्या महिला देखील होते. ज्यांना ती दिल्लीतील अनेक फाइव्ह स्टार हॉटेल आणि फार्म हाऊसमध्ये देखील पाठवायची.

नवी दिल्ली - दिल्लीतील सर्वात मोठे सेक्स रॅकेट चालविणार्‍या गीता अरोरा उर्फ सोनू पंजाबन (३५) हिला कोर्टाकडून २४ वर्ष तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. स्थानिक कोर्टाने ही शिक्षा ठोठावताना तिने महिला म्हणून सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत आणि त्यामुळेच ती कठोर शिक्षेस पात्र असल्याचे सांगितले आहे. अपहरण, वेश्या व्यवसाय आणि अनैतिक तस्कर, ४ वर्ष अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांना देहविक्रीस भाग पडणे अशा आरोपांखाली तिला शिक्षा सुनावण्यात आली.  सोनूला कोर्टाने नुकतीच २४ वर्षांची शिक्षा सुनावली असून तिचा त्याचा साथीदार संदीप बेनीवाल यालाही २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच्यावर अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचा आरोप होता. दरम्यान, कोर्टाने अल्पवयीन मुलीला ७ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. सोनू पंजाबनचा जन्म पूर्व दिल्लीत झाला होता. काही वर्षांपूर्वी तिने दक्षिण दिल्लीच्या उच्चभ्रू वस्तीत घर घेतले होते. तेव्हापासून ती दिल्ली पोलिसांच्या रडारवर होती. तिने देशातील जवळजवळ प्रत्येक राज्यात वेश्या व्यवसाय सुरु केला होता.

सोनू पंजाबन उर्फ गीता अरोरा देशातील अनेक राज्यात वेश्याव्यवसाय चालवत होती. हा धंदा ती दक्षिण दिल्लीतून चालवत होती. ती अभिनेत्री किंवा मॉडेल बनण्याची इच्छा असणाऱ्या मुलींना आपल्या जाळ्यात ओढून किंवा त्यांचे अपहरण करुन ती त्यांना जबरदस्तीने या सेक्स रॅकेटच्या धंद्यात ओढायची. त्यानंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जायचे. आपल्या या सेक्स रॅकेटमध्ये ती मुलींना हायप्रोफाईल लोकांकडे पाठवायची. २०११ साली पोलिसांच्या माहितीनुसार, तिच्याकडे अनेक हायप्रोफाईल देहविक्री करणाऱ्या महिला देखील होते. ज्यांना ती दिल्लीतील अनेक फाइव्ह स्टार हॉटेल आणि फार्म हाऊसमध्ये देखील पाठवायची.हरियाणाच्या झज्जरमधील एका खून प्रकरणात देखील तिला अटक करण्यात आली होती. सोनूला २००७ मध्ये पहिल्यांदा एका तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली होती, मात्र तिला जामीन मिळाला आणि त्यानंतर २००८ मध्ये तिला पुन्हा अटक झाली होती. २०११ मध्ये एजंट बनून पोलिसांनी तिला पुन्हा जेरबंद केले. यावेळी पोलिसांनी तिला तिच्या चार साथीदारांसह मैहरोली येथून अटक केली होती. मात्र, कोणताही ठोस पुरावा नसल्याने ती पुन्हा तुरुंगातून बाहेर आली होती.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

वकिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देऊ शकत नाही, राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

 

...अन् फेसबुक फ्रेंडनं महिलेला घातला थोडा थोडका नव्हे, तर ११ लाखांचा गंडा

 

मनोरुग्ण तरुणीवर कारमध्ये अत्याचार; विवस्त्रवस्थेत आढळून आली पीडित तरुणी

 

कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानची नवीच शक्कल; हायकोर्टाकडून वकील देण्याची मागणी

 

विकास दुबेला जामीन कसा मिळाला हा मुख्य मुद्दा; सुप्रीम कोर्टानं योगी सरकारला फटकारलं

 

कोर्टाचा दणका! राजा मान सिंग फेक चकमकप्रकरणी ११ पोलिसांनी जन्मठेपेची शिक्षा 

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटCourtन्यायालयProstitutionवेश्याव्यवसायArrestअटकPoliceपोलिसdelhiदिल्ली