सोनगीर पोलिसांनी गुरांची वाहतूक करणारे वाहन पकडले, चालक फरार

By अतुल जोशी | Updated: September 11, 2023 16:41 IST2023-09-11T16:41:12+5:302023-09-11T16:41:33+5:30

पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

Songir police caught the vehicle transporting cattle, the driver is absconding | सोनगीर पोलिसांनी गुरांची वाहतूक करणारे वाहन पकडले, चालक फरार

सोनगीर पोलिसांनी गुरांची वाहतूक करणारे वाहन पकडले, चालक फरार

अतुल जोशी, धुळे :  सोनगीर पोलिसांनी गुरांची वाहतूक करणारे वाहन पकडले. वाहनातून तीन गुरांची सुटका करण्यात आली. अंधाराचा फायदा घेत चालक फरार झाला. पोलिसांनी एकूण ४ लाख ८३ हजाराचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई सोमवारी पहाटे मुंबई-आग्रा महामार्गावरील टोलजवळ केली.

सोमवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास सोनगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई आग्रा महामार्गावरील वाघाडी फाटा ते टोलप्लाझाच्या दरम्यान सोनगीर पोलिस स्टेशनचे सुरज कुमार साळवे, नरेंद्र गिरासे, विजयसिंग पाटील  हे पेट्रोलिंग गस्त घालत असताना भरधाव वेगाने येणारे चारचाकी वाहन (क्र. एम पी ०९ व्ही ४९५४) हे  संशयास्पद वाटले. पोलिसांनी चालकाला थांबण्याचा इशारा केला असता, चालकाने वाहन भरधाव नेले. काही अंतरावर वाहन सोडून तो फरार झाला.  गस्तीपथकाने वाहनाची तपासणी केली असता त्यात तीन गुरे आढळून आली.   याप्रकरणी ३३ हजार रूपये  किमतीची गुरे व सुमारे साडे चार लाख रूपये किंमतीचे वाहन असा ४ लाख ८३ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.  

Web Title: Songir police caught the vehicle transporting cattle, the driver is absconding

टॅग्स :Dhuleधुळे