शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 17:24 IST

मेघालयमधील शिलाँग येथे घडलेल्या राजा रघुवंशी हत्याकांडाचे गूढ आता उलगडले आहे. आता सोनमबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मेघालयमधील शिलाँग येथे घडलेल्या राजा रघुवंशी हत्याकांडाचे गूढ आता उलगडले आहे. पोलिसांनी आरोपी सोनम रघुवंशीला (राजाची पत्नी) आणि तिच्या साथीदारांना घटनास्थळी नेऊन गुन्ह्याची पुनर्रचना केली, जिथे सोनमने तिचा पती वेदनेने तडफडून मरताना पाहिल्याचे उघड झाले. या घटनेनंतर मेघालय पोलिसांनी इंदूरमधील सोनमच्या फ्लॅटचीही झडती घेतली, जिथे ती १४ दिवस लपून बसली होती.

सोनमबद्दल आणखी एक धक्कादायक सत्य उघड!आता सोनमबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजा रघुवंशी यांच्याशी लग्न करण्यापूर्वी मध्य प्रदेशातील धार येथील एका व्यापारी कुटुंबातील मयांक रघुवंशी नावाच्या मुलासाठी सोनमला पसंत करण्यात आले होते. दोन्ही कुटुंबांनी लग्नासाठी तयारी केली होती आणि कुंडली जुळवल्या, तेव्हा ३६ पैकी २५ गुण जुळले होते.

मात्र, मयांकच्या कुटुंबाने एका ज्योतिषाचा सल्ला घेतला. ज्योतिषाने कुंडली काळजीपूर्वक तपासल्यानंतर सांगितले की, हे लग्न त्यांच्यासाठी योग्य नाही आणि यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. ज्योतिषाच्या या सल्ल्यानंतर, मयांकच्या कुटुंबाने सोनमचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजा रघुवंशीच्या हत्येची बातमी समोर आल्यानंतर, मयंकच्या कुटुंबाने देवाचे आभार मानले की त्यांनी सोनमचा प्रस्ताव स्वीकारला नाही, अन्यथा आज त्यांचा मुलगा कदाचित जिवंत नसता.

सोनम आणि राजाचे नाते कसे जुळले?इंदूर येथील राजा रघुवंशी यांच्याशी सोनमचे नाते रामनवमीला प्रकाशित होणाऱ्या 'रघुवंशी रिश्ता' मासिकातून जुळले. या मासिकात दोघांचा परिचय प्रकाशित झाला आणि त्यानंतर दोन्ही रघुवंशी कुटुंबांनी त्यांना एकमेकांसाठी पसंत केले. ऑक्टोबरमध्ये सोनम आणि राजाचे लग्न ठरले आणि ११ फेब्रुवारी रोजी त्यांनी लग्न केले. त्यानंतर तीन महिन्यांनी, ११ मे रोजी त्यांनी पुन्हा एकदा लग्न केले. २० मे रोजी दोघे हनिमूनसाठी मेघालयला गेले आणि २३ मे रोजी सोनमने राजाची हत्या केली.

लग्नापूर्वीपासूनच सोनमचे अफेअर आणि हवाला व्यवसायपोलिसांच्या तपासानुसार, सोनमचे तिच्या वडिलांच्या प्लायवूड कंपनीत काम करणाऱ्या राज कुशवाहा नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. सोनम कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या खात्यांचे काम पाहत असे आणि याच दरम्यान तिची राजशी जवळीक वाढली. नंतर, दोघेही हवाला व्यवसायात सामील झाले, जिथे सोनमने अवघ्या आठ महिन्यांत लाखो रुपये कमावले. राजच्या प्रेमाच्या आणि हवाला व्यवसायातून मिळालेल्या पैशाच्या लोभातून सोनमने आपल्या पतीची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूhusband and wifeपती- जोडीदार