शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:40 IST

Sonam Raja Raghuvanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यापूर्वी सोनम त्याला आसाममधील गुवाहाटीला घेऊन गेली होती. तिथला फोटो आता समोर आला आहे. 

Sonam Raghuwanshi News: मेघालयातील हनिमून प्रकरण देशभरात चर्चिले जात आहे. सोनम रघुवंशीने लग्नाच्या काही दिवसानंतरच पती राजा रघुवंशीची मेघालयात नेऊन क्रूरपणे हत्या केली. राजा रघुवंशीची हत्या होण्यापूर्वी ते दोघे कामाख्या देवीच्या दर्शनालाही गेले होते. त्याचा फोटो आता समोर आला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

लग्नानंतर सोनम रघुवंशी पती राजा रघुवंशीसोबत कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेली होती. मेघालय पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, काही गोष्टी समोर आल्या आहेत. 

सोनम म्हणाली, कामाख्या देवीला नवस केलाय 

तपासातून जी माहिती समोर आली आहे, त्यातून सोनम आणि राजा रघुवंशी कामाख्या देवीच्या दर्शनाचे कनेक्शन समोर आले आहे. लग्नानंतर सोनमने राजाला जवळही येऊ दिले नाही. 

सोनम राजाला म्हणाली की, तिने कामाख्या देवीला नवस केलेला आहे. देवीचे दर्शन केल्यानंतरच आपल्यात शरीरसंबंध होतील. हेच कारण पुढे करून सोनम राजाला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवहाटीला घेऊन गेली होती. 

वाचा >>हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

पोलिसांकडून जी माहिती दिली गेली आहे, त्यात म्हटलं आहे की, प्राथमिक तपासानुसार, सोनम आणि राज कुशवाह यांचे प्रेमसंबंध आहेत. दोघांनी मिळून गुवहाटी आणि मेघालयचा प्लॅन तयार केल्याचे दिसत आहे. दरम्यान, राजा रघुवंशीचा कामाख्या देवीच्या मंदिरातील एक फोटो समोर आला आहे. हे राजाचे कामाख्या देवीचे शेवटचे दर्शन ठरले. 

आकाश, आनंद आणि विशाल

प्राथमिक तपासातून जी माहिती समोर आली आहे, त्यात असे आढळून आले आहे की, सोनमने राजाची हत्या करण्यासाठी सुपारी दिली होती. आकाश, विशाल आणि आनंद असे पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. 

१९ मे रोजी गुवाहाटीतील आनंद लॉजमध्ये हे तिघे थांबले होते. आम्ही विद्यार्थी आहोत, असे त्यांनी सांगितले होते आणि ओळखपत्रही जमा केले होते. तिघेही इंदौरवरून आले होते आणि २० मे रोजी सकाळी न सांगताच निघून गेले होते. आता या लॉजच्या मॅनेजरकडून पोलीस अधिकची माहिती घेत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिस