शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

Sonam Raghuwanshi: हत्या होण्यापूर्वी राजा रघुवंशी सोनमसोबत इथे थांबला होता, पहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 14:11 IST

Sonam Raghuwanshi Raja Raghuwanshi: राजा रघुवंशी हत्या प्रकरणाने सगळेच अंचबित झाले आहेत. हनिमूनला नेऊन पतीची हत्या केल्याचा आरोप सोनमवर आहे. राजाची हत्या होण्यापूर्वी ज्या गेस्ट हाऊसमध्ये ते थांबले होते. त्याचा व्हिडीओ समोर आलाय. 

Sonam Raghuwanshi Raja Raghuwanshi News: एखाद्या चित्रपटाची कथा वाटावी, असा घटनाक्रम राजा रघुवंशी हत्या प्रकरणात समोर आला आहे. लग्नानंतर अवघ्या काही दिवसातच सोनम रघुवंशीने राजाचा काटा काढला. सोनमने हत्या करण्यापूर्वी आणि केल्यानंतरच्या अनेक गोष्टी समोर येत आहे. आता त्या हॉटेलचा व्हिडीओ समोर आलाय, ज्यात हनिमूनला गेलेले राजा आणि सोनम थांबले होते.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांनी त्याची पत्नी सोनम रघुवंशीसह आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे.  राजासोबत लग्न करण्यास सोनमचा विरोध होता. पण, कुटुंबीयांनी तिचा विरोध झुगारून देत लग्न लावून दिलं. त्यानंतर सोनमने राजाची हत्या केली अशी माहिती आतापर्यंत समोर आली आहे. 

राजा-सोनम या गेस्ट हाऊसमध्ये थांबले होते

सोनम आणि राजा हनिमूनसाठी मेघालयात गेले होते. मेघालयातील शिलाँगमध्ये ते फिरणार होते. त्यांनी एका गेस्ट हाऊसमध्ये रुम बुक केली होती. ज्या दिवशी राजाची हत्या झाली. त्याच्या एक दिवस आधी ते या गेस्ट हाऊसमध्ये थांबले होते. बालाजी गेस्ट हाऊस असे त्याचे नाव आहे.  

वाचा >>राजा रघुवंशी प्रकरणात समोर आले आणखी एक नाव, सोनम-राजशी आहे थेट कनेक्शन! कोण आहे 'हा' व्यक्ती?

सोनमचा लग्नाला होता विरोध

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमला राजासोबत लग्न करायचं नव्हतं. तिने तिच्या आईला सांगितलं होतं की, राजावर नाही, तर राज कुशवाहवर प्रेम आहे. तुम्ही माझं लग्न राजासोबत करून दिले, तर पुढे जे काही होईल त्यासाठी तयार रहा. 

सोनमचा विरोध असतानाही तिच्या आईवडिलांनी राजा रघुवंशीसोबत लग्न लावून दिले. जातीबाहेर लग्न केल्यावर बदनामी होईल असे सांगून सोनमला तिच्या आईने तयार केले होते. पण, सोनम शेवटपर्यंत तयार झाली नाही. अखेर तिने लग्नानंतर हनिमूनला नेऊन राजाला संपवलं. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिसViral Videoव्हायरल व्हिडिओ