शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 12:27 IST

Raja Raghuvanshi Murder Case: ज्या ठिकाणी राजा रघुवंशीची हत्या करण्यता आली, तिथे पोलीस आरोपींना घेऊन गेले होते. त्यानंतर हत्येचा सगळा घटनाक्रम उलगडला गेला. 

Raja Raghuvanshi Murder Case: चेरापुंजीतील वेइ साडोंग धबधब्याजवळ नेऊन सोनम रघुवंशीने राजाची हत्या केली. ज्याठिकाणी राजावर नागा तलवारीने वार करण्यात आले, तिथे आरोपीने मंगळवारी (१७ जून) नेण्यात आले होते. हत्येचा सीन रिक्रिएट करण्यात आला. त्यातून महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली. 

लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचा तपास एसआयटी करत आहे. तपास अधिकारी मंगळवारी (१७ जून) आरोपींना घटनास्थळी घेऊन गेले होते. शिलाँगपासून ६५ किमी अंतरावर असलेल्या वेई साडोंगच्या धबधब्याजवळ ही घटना घडली होती. 

राजावर नागा तलवारी हल्ला, सोनम दूर पळाली

इंदूरमधील व्यावसायिक राजा रघुवंशीची मेघालयमध्ये हत्या करण्यात आली. हनिमूनसाठी गेलेले असताना राजाची पत्नी सोनम रघुवंशीनेच हत्या केली. सोनमने प्रियकर राजा कुशवाह सोबत मिळून कट रचला आणि त्यानंतर लोकांची गर्दी नसलेल्या ठिकाणी नेऊन हत्या करण्यात आली. 

वाचा >>"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, २९ वर्षीय राजा रघुवंशी याच्यावर नागा तलवारीने विशाल सिंह चौहानने वार केला. धारदार डावोने (नागा तलवार) हल्ला केल्यानंतर राजाला रक्तस्राव होऊ लागला. 

राजाचा मृत्यू झाल्यावर सोनम आली घटनास्थळी

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे राजा रक्तबंबाळ झाला. त्याला वेदना होऊ लागल्या. राजा ओरडायला लागला. ते बघून सोनम हत्येचा ठिकाणापासून पळून गेली. त्यानंतर राजावर विशाल आणि त्याच्यासोबतच्या एकाने आणखी वार केले. जीव जाईपर्यंत त्याला आरोपी मारत होते. राजाचा मृत्यू झाल्यानंतरच सोनम पुन्हा तिथे आली, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. 

राजाची हत्या करण्यासाठी दोन नागा तलवारी नेण्यातआल्या होत्या. मात्र, एकाच तलवारीचा वापर करण्यात आला. हत्येसाठी नेण्यात आलेली, पण वापर न केलेली दुसरी तलवारही पोलिसांना मिळाली आहे. ज्या दरीत राजाचा मृतदेह सापडला, तिथेच दुसरी तलवार होती. वेई साडोंग पार्किंगपासून जवळ असलेल्या दरीत राजाला फेकण्यात आले होते. सीन रिक्रिएट केल्यानंतर पोलिसांना दुसऱ्या तलवारीची माहिती मिळाली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेश