शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
5
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
6
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
7
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
8
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
9
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
10
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
11
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
12
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
13
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
14
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
15
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
17
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
18
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
19
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...

Sonam Raghuvanshi : "मी कोणाशीही लग्न केलं तरी मी तुझीच गर्लफ्रेंड...", सोनमसमोर स्टेजवर ढसाढसा रडला राज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 13:43 IST

Raja Raghuwanshi And Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी लग्नानंतर स्वतः तिच्या नवऱ्याला मारण्याचा कट रचत होती. तिच हत्येची मास्टरमाईंड आहे. सोनमने तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाह आणि चार कॉन्ट्रॅक्ट किलरच्या मदतीने हा कट रचला.

सोनम रघुवंशी लग्नानंतर स्वतः तिच्या नवऱ्याला मारण्याचा कट रचत होती. तिच हत्येची मास्टरमाईंड आहे. सोनमने तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाह आणि चार कॉन्ट्रॅक्ट किलरच्या मदतीने हा कट रचला. पोलीस पथक सर्व आरोपींना ट्रान्झिट रिमांडवर शिलाँगला घेऊन जात आहे, जिथे त्यांची अधिक चौकशी केली जाईल. मेघालय पोलिसांनी संपूर्ण ऑपरेशनला 'ऑपरेशन हनिमून' असं नाव दिलं होतं.

सोनमने तिच्या कुटुंबाच्या संमतीने राजा रघुवंशीशी लग्न केलं, परंतु तिचं राज कुशवाहवर प्रेम होतं. लग्नानंतर सोनमने राजाला आपल्या मार्गातून हटवण्याचा कट रचण्यास सुरुवात केली. रिपोर्टनुसार, सोनमचे लग्न ठरल्यानंतरही सोनम रघुवंशी राजला भेटायची. सोनम राजसाठी कपडे, महागड्या वस्तू खरेदी करायची आणि त्याच्या गरजा पूर्ण करायची असं म्हटलं जातं.

राजाच्या हत्येचा प्लॅन अयशस्वी झाला असता तर काय करणार होती सोनम? बॅकअप प्लॅन तयार

सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह तिला म्हणायचा 'दीदी'; कोणी केला धक्कादायक दावा?

सोनम आणि राजा रघुवंशी यांच्या लग्नाला राजही उपस्थित होता. सोनम स्टेजवर येताच राज ढसाढसा रडू लागला. राजला रडताना पाहून सोनमच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याचं सांत्वन केलं. कुटुंबातील सदस्यांना वाटलं की, एकत्र काम केल्यामुळे राज भावनिक झाला असावा. त्याच वेळी सोनमने राजला सांगितलं होतं की, जरी मी कोणाशीही लग्न करत असले तरी मी तुझीच गर्लफ्रेंड राहीन.

"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल

"राजचं नाव ऐकलं अन्..."; पोलिसांच्या एका ट्रिकने फेल झाला सोनमचा 'तो' प्लॅन

लग्नानंतरही सोनमने राजला मिळवण्यासाठी हत्येचा संपूर्ण कट रचला. लग्नानंतर तिने हनिमूनचा प्लॅन केला. राजा आणि सोनम विमानाने गेले पण सर्व आरोपी ट्रेनने गेले. सोनमने स्वतः तिकिटं बुक केली. सर्व आरोपी २१ मे रोजी गुवाहाटीला आले. त्यानंतर, ते २२ मे रोजी सोनमच्या मागे शिलाँगला गेले. २३ मे रोजी त्यांनी राजाची हत्या केली.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक