शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सोनम रघुवंशीनेच राजाला दरीत ढकललं, आरोपींचा नवा धक्कादायक खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 15:44 IST

Raja Raghuvanshi Case : शिलाँग येथे झालेल्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणात आता धक्कादायक सत्य समोर आले आहे.

शिलाँग येथे झालेल्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणात आता धक्कादायक सत्य समोर आले आहे. ९ जून रोजी मिळालेल्या माहितीनुसार, राजाचा खून त्याची पत्नी सोनमनेच केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला स्वतःला निष्पाप आणि पीडित दाखवण्याचा सोनमचा प्रयत्न फसला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिलाँगच्या दऱ्यांमध्ये राजा रघुवंशीला शेवटचा धक्का सोनमनेच दिला होता. याचा अर्थ, तिनेच आपल्या पतीला दरीत ढकलले होते. विशेष म्हणजे, दरीत फेकण्यापूर्वी राजाचा श्वास सुरू होता आणि अखेरच्या श्वासापर्यंत तो मारेकऱ्यांशी लढत राहिला होता.

हत्त्येचा पूर्वनियोजित कटराज कुशवाहा, सोनम आणि तीन मारेकऱ्यांनी मिळून राजाच्या हत्त्येचा कट रचला होता. राजा आणि सोनम शिलाँगमध्ये पोहोचताच आरोपींनी राजावर हल्ला केला. राजाने धैर्याने प्रतिकार केला, परंतु त्याच्या छातीवर आणि डोक्यावर झालेल्या गंभीर जखमांमुळे त्याला प्रतिकार करणे कठीण झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार आरोपींपैकी एक विशाल चौहान याने राजाच्या डोक्यावर मागून हल्ला केला. यावेळी सोनम तिथे उभी राहून, "त्याला मारून टाका!" असे ओरडत होती. आरोपींनी सांगितले की, राजा रघुवंशीला दरीत ढकलण्यापूर्वी तो जिवंत होता. त्याला दरीत ढकलण्यात अडचण येत असल्याने सोनमने त्याला मदत केली आणि शेवटचा धक्का दिला, ज्यामुळे राजा रघुवंशी खोल दरीत कोसळला.

हत्येपूर्वी आईशी संवाद, मारेकऱ्यांची रेकीआरोपींनी असेही सांगितले की, हत्येच्या केवळ अर्धा तास आधी सोनमने राजाच्या आईशी फोनवर बोलले होते. आरोपींपैकी आकाश नावाचा एक जण खाली बाईकवर पाळत ठेवून होता, जेणेकरून कोणी येत आहे का याची तो माहिती देऊ शकेल. सोनमने नेमलेल्या मारेकऱ्यांनी हत्येच्या एक दिवस आधी, म्हणजेच २२ मे रोजी, राजाशी मैत्री केली. राजाला विश्वासात घेऊन त्यांनी २३ मे रोजी या भयंकर कटाला पूर्णत्वास नेले. हत्येनंतर सर्व आरोपी राज कुशवाहासोबत इंदूरला परत आले, तर सोनम तिथेच फिरत होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू