शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Sonali Phogat Death: सोनाली फोगटच्या मृत्यूचं गूढ वाढलं, CCTV फुटेज समोर; 'त्या' ४ तासांत काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 20:20 IST

सोनालीच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आहेत. सोनालीच्या मृत्यूचं कारण पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये सांगितले नाही.

नवी दिल्ली - टिकटॉक स्टार आणि भाजपा नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यूचं गुढ वाढतच चाललं आहे. सुरुवातीला सोनालीचा मृत्यू ह्दयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगण्यात आले. परंतु आता या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. यात आरोपी सुधीर सांगवान आणि सुखविंदर सांगवान यांची गोवा पोलीस चौकशी करत आहेत. सोनाली फोगटच्या शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी तीक्ष्ण वस्तूंच्या जखमांच्या खुणा असल्याचे समोर आलं आहे.

त्यातच आता सोनाली फोगटच्या मृत्यूशी संबंधित एक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. त्यात मंगळवारी २३ ऑगस्टला सकाळी ६.३० वाजता सोनाली ठीक होती हे दिसून येते. परंतु त्यानंतर १० वाजता सोनालीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते. त्यामुळे या ४ तासांत काय घडलं? हा प्रश्न निर्माण होतो. पोलीस आता या घटनेशी सखोल चौकशी करत असून सोनालीच्या मृत्युपूर्वीचे २ तास आधीचे महत्त्वपूर्ण सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. 

सध्या पोलिसांनी संशयाच्या आधारे सुधीर सांगवान आणि सुखविंदर सांगवान यांना ताब्यात घेतले आहे. हे दोघं सोनालीचे स्टाफ मेंबर होते. सुधीर सोनालीचा पीए होता. सोनालीच्या कुटुंबाने सुधीरवर गंभीर आरोप केले आहेत. राजकीय षडयंत्रापोटी सोनालीची हत्या झाल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. सध्या या दोन्ही संशयितांशी चौकशी सुरू आहे. परंतु सोनालीच्या शवविच्छेदन अहवालानं सगळेच हैराण झाले आहेत. 

सोनालीच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आहेत. सोनालीच्या मृत्यूचं कारण पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये सांगितले नाही. सध्या विसरा आणि टिस्यू तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवलं आहे. मात्र गोवा पोलिसांनी याबाबत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज आणि सोनालीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. त्याशिवाय स्टाफची पोलीस चौकशी करत आहेत. फार्म हाऊसवर होणार अंत्यसंस्कारसोनालीचं पार्थिव आज रात्री गोव्यातून हरियाणाच्या हिसार इथं आणलं जाईल. शुक्रवारी फार्म हाऊसवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. सोनालीचा मृत्यू २३ ऑगस्टला सकाळी १० वाजता गोव्यातील एका हॉटेलमध्ये झाल्याचं समोर आले. भाजपाच्या काही लोकांसोबत ती गोव्याला गेली होती. सोनालीच्या मृत्यूवर सर्वात आधी तिची बहिण रेमनं प्रश्न उपस्थित केले. जेवण झाल्यानंतर तिला अस्वस्थ वाटत होते असं सोनालीने तिच्या आईला म्हटलं होते. कदाचित तिच्या जेवणात काही मिसळले असावे असा संशय कुटुंबाने व्यक्त केला.  

टॅग्स :BJPभाजपाPoliceपोलिस