मुलानं केला वडिलांच्या हत्येचा उलगडा, आरोपी आईचा डाव सगळ्यांसमोर हाणून पाडला, मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 05:18 PM2022-01-17T17:18:03+5:302022-01-17T17:18:32+5:30

मुलानं हा सगळा प्रकार शोकसभेत उघड केल्याने त्याच्या काकाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली

Son reveals father's murder, accused mother arrested by police in bengaluru | मुलानं केला वडिलांच्या हत्येचा उलगडा, आरोपी आईचा डाव सगळ्यांसमोर हाणून पाडला, मग...

मुलानं केला वडिलांच्या हत्येचा उलगडा, आरोपी आईचा डाव सगळ्यांसमोर हाणून पाडला, मग...

Next

बंगळुरु – एका मुलाने त्याच्या वडिलांच्या मारेकऱ्याचा चेहरा उघड केला आहे. बंगळुरुत कारेनहल्ली परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय एन. राघवेंद्र यांचा मृत्यू सुरुवातीला नैसर्गिक कारणामुळे झाल्याचं मानलं जात होतं. परंतु त्यांच्या १० वर्षीय मुलाने मारेकऱ्यांचा डाव सगळ्यांसमोर उघड केला. राघवेंद्र यांच्या मृत्यूनंतर झालेल्या शोकसभेत राघवेंद्रं यांच्या मुलानं  वडिलांचा खून झाल्याचं सांगितले तेव्हा सगळ्यांना धक्काच बसला. घटनेच्या वेळी एक बाहेरील व्यक्ती घरात उपस्थित होतो असा दावा मुलाने केला.

मिळालेल्या माहितीनुसार, एन राघवेंद्र हे घरी मृत अवस्थेत आढळले होते. त्यांची पत्नी शैलजाने पतीच्या भावाला फोन करुन राघवेंद्र यांना अटॅक आल्यामुळे खाली पडल्याचं सांगितले. ज्यानंतर त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेले परंतु तिथे मृत घोषित केले. काही दिवसांनी मृत राघवेंद्र यांच्या कुटुंबाने एका शोकसभेचे आयोजन केले. तेव्हा शैलजा आणि तिचा मुलगाही उपस्थित होता. यावेळी आजोबाशी बोलताना राघवेंद्रच्या १० वर्षीय मुलाने ज्यादिवशी वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा घरात आणखी एक व्यक्ती हजर असल्याचं सांगितले. तेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला.

राघवेंद्र यांच्या डोक्याला मार

मुलाने सांगितले की, घरात आवाज होत असल्याने मी अर्ध्या रात्री उठलो. तेव्हा आई आणि आजी यांनी वडिलांना खाली दाबल्याचं दिसलं. तर एक व्यक्ती त्यांच्या डोक्यावर मारत होता. जेव्हा मुलाने विचारले वडिलांना का मारताय? तेव्हा त्या व्यक्तीने मलाही जोरात मारत तोंड बंद ठेवण्याची धमकी दिली. घडलेल्या प्रकाराबद्दल जर कुणासमोर वाच्यता केली तर तुलाही मारुन टाकेन अशी धमकी दिल्याने मी खूप घाबरलो आणि पुन्हा बेडरुममध्ये गेलो असं तो म्हणाला.

मुलानं हा सगळा प्रकार शोकसभेत उघड केल्याने त्याच्या काकाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तपास करत पत्नी शैलजा, तिची आई लक्ष्मीदेवम्मा आणि हनुमंथा नावाच्या व्यक्तीला अटक केली. तपासात कळालं की, शैलजा आणि हनुमंथा या दोघांचे अफेअर सुरु होते. राघवेंद्रने शैलजाला हनुमंथासोबतच्या संबंधांवर अनेकदा विचारले. या वादावरुन अनेकदा शैलजा आणि राघवेंद्र यांच्यात खटके उडाले होते. म्हणून शैलजा आणि हनुमंथा दोघांनी मिळून राघवेंद्रचा काटा काढण्याचा प्लॅन बनवला.

Web Title: Son reveals father's murder, accused mother arrested by police in bengaluru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app