तुमसर (भंडारा) : घरगुती वादावरून मुलाने रागाच्या भरात वडिलांच्या डोक्यावर लोखंडी पाईपने मारहाण केली. त्यात वडील रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वडिलांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथे शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास घडली.राजेश बंधाटे (४५) रा. देव्हाडी असे मृताचे नाव आहे.तर आरोपी मुलाचे नाव रोहित राजेश बंधाटे (२४) असे आहे. वडील राजेश बंधाटे व त्यांचा मुलगा रोहित बंधाटे यांचे घरगुती वादावरून कडाक्याचे भांडण झाले. त्यात रोहितने रागाच्या भरात घरातील लोखंडी पाईप वडिलांच्या डोक्यावर, मानेवर मारला. यात वडील राजेश रक्ताच्या थारोळ्यात खाली पडले. या घटनेची माहिती देव्हाडी पोलीस चौकीला देण्यात आली. परिसरात एकच बघ्यांची गर्दी जमा झाली. राजेश यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.आरोपी रोहित बंधाटे याला तुमसर पोलिसांनीअटक करून भांदवी ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीही आरोपी रोहितने वडील राजेश यांना मारहाण केली होती अशी माहिती आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर पिपरेवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गबने पोलीस शिपाई जितू मल्होत्रा करीत आहेत. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.
मुलाने जन्मदात्या बापाची केली हत्या; घरगुती वाद ठरला अनर्थाचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 13:57 IST
Murder Case : ही दुर्दैवी घटना तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथे शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास घडली.
मुलाने जन्मदात्या बापाची केली हत्या; घरगुती वाद ठरला अनर्थाचे कारण
ठळक मुद्देराजेश बंधाटे (४५) रा. देव्हाडी असे मृताचे नाव आहे.तर आरोपी मुलाचे नाव रोहित राजेश बंधाटे (२४) असे आहे.