शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

व्यसनाला कंटाळून मुलानेच केली वडिलांची हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2018 18:04 IST

विचित्र वागण्याला आणि व्यसनाला कंटाळून पोटच्या मुलानेच मित्रांच्या मदतीने वडिलांचा गळा आवळून खून करून मृतदेह कॅनॉलामध्ये फेकल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.

पुणे : विचित्र वागण्याला आणि व्यसनाला कंटाळून पोटच्या मुलानेच मित्रांच्या मदतीने वडिलांचा गळा आवळून खून करून मृतदेह कॅनॉलामध्ये फेकल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकरणी सिंहगड पोलिसांनी मुलाला अटक केली असून, न्यायालयाने त्याला २१ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी एम. एस. ए. सय्यद यांनी दिला आहे. 

          गणपत बापु शेडगे उर्फ सोन्या (वय १९, रा. तुकाईनगर, वडगांव बुद्रुक, वडगाव) असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे. तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. बापु अशोक शेडगे (वय ४०, रा. तुकाईनगर) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई नामदेव सर्जेराव बंडगर (वय ३०) यांनी फिर्याद दिली आहे. १२ आॅगस्ट रोजी हडपसर येथील कवडे मळा परिसरात ही घटना घडली. 

          बंडगर हे १२ आॅगस्ट रोजी मगरपट्टा बिट मार्शल ड्युटीवर होते. त्यावेळी नियंत्रण कक्षाकडून आलेल्या संदेशामध्ये ससाणेनगर येथील कॅनॉलमध्ये एक शव वाहत जात असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर घटनास्थळी जावून कॅनॉलमधून शव बाहेर काढण्यात आले. कोणीतरी अज्ञात कारणावरून त्यांचे हातपाय बांधून त्यांना कॅनॉलमध्ये फेकून दिल्याचे त्यावेळी दाखल फियार्दीमध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान गणपत याने श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्यात हजर राहून आपणच वडिलांचा दोरीने व उशीने गळा आवळून आणि लाटण्याने मारहाण केली. मारहाणीनंतर बापु निपचीत पडले असता त्यांचे हातपाय बांधून घराजवळच्या कॅनॉलमध्ये फेकून दिले, अशी कबूली  दिली. या प्रकरणी गणपत याला न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यात वापरलेली दोरी, लाकडी दांडके जप्त करण्यासाठी, त्याचे इतर कोणी साथीदार होते का? याचा शोध घेण्यासाठी त्याला पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकील राजश्री कदम यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेMurderखूनCrimeगुन्हाPoliceपोलिस