विवाहबाह्य संबंध असलेल्या आईच्या प्रियकराची मुलानेच केली हत्या 

By पूनम अपराज | Updated: December 29, 2020 14:34 IST2020-12-29T14:18:56+5:302020-12-29T14:34:00+5:30

Murder : धारावी पोलिसांनी आरोपी विरोधात भा. दं. वि. कलम ३०२, ३०७ अन्वये गुन्हा नोंदवला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

The son killed the mother's lover who had an extramarital affair | विवाहबाह्य संबंध असलेल्या आईच्या प्रियकराची मुलानेच केली हत्या 

विवाहबाह्य संबंध असलेल्या आईच्या प्रियकराची मुलानेच केली हत्या 

ठळक मुद्देरविवारी दुपारी सचिन हा परिसरातील लक्ष्मी स्टोअरमागे असताना आरोपीने त्या ठिकाणी त्याला रस्त्यात गाठून त्याला अडवले. सचिनच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

धारावी परिसरात आईसोबत असलेल्या अनैतिक संबधावरून ३६ वर्षीय व्यक्तीची मुलानेच हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सचिन कुचीकोवर असं या मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी धारावी पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे.

खळबळजनक! एसआरपीएफ जवानाची गळफास घेऊन आत्महत्या

धारावीच्या शिवशक्तीनगर परिसरात संक्कया मार्ग येथे सचिन कुचीकोवर हा आपल्या कुटुंबियांसोबत राहतो. त्याच परिसरात आरोपी हा त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतो. सचिनचे आरोपीच्या आईसोबत विवाहबाह्य संबंध असल्याची चर्चा होती. याबाबत सुगावा आरोपीला लागल्यानंतर त्याने सचिनचा काटा काढायचे ठरवले. रविवारी दुपारी सचिन हा परिसरातील लक्ष्मी स्टोअरमागे असताना आरोपीने त्या ठिकाणी त्याला रस्त्यात गाठून त्याला अडवले. त्यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि वाद इतक्या विकोपाला गेला की, दोघांची कडाक्याचे भांडण झाले. नंतर भांडणाचे पर्यावसन हाणामारीत झाले. त्यावेळी आऱोपीने सचिनच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर धारावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोवर सचिन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. नंतर पोलिसांनी जखमी सचिनला सायन रुग्णालयात दाखल केले. सचिनच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान सचिनच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून धारावी पोलिसांनी आरोपी विरोधात भा. दं. वि. कलम ३०२, ३०७ अन्वये गुन्हा नोंदवला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: The son killed the mother's lover who had an extramarital affair