जावयबापूंची अशीही वरात निघू शकते! डीजे लावला, तोंडाला शेण फासले, चपलाची माळ घालून गावभर फिरवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 15:30 IST2022-10-07T15:29:45+5:302022-10-07T15:30:01+5:30
जावई म्हणजे मुलीचा नवरा, त्याला सासरी एवढा मान असतो की सासू सासरे कुठे ठेवू आणि कुठे नको असे करतात.

जावयबापूंची अशीही वरात निघू शकते! डीजे लावला, तोंडाला शेण फासले, चपलाची माळ घालून गावभर फिरवले
मध्य प्रदेशच्या नर्मदापुरम जिल्ह्यात पत्नीला माहेरहून आणण्यासाठी गेलेल्या जावयाला विचित्र अनुभवाला सामोरे जावे लागले आहे. सासरच्यांनी खूप बेइज्जत केल्याचा प्रकार घडला आहे. डीजेच्या तालावर अर्धनग्न करत वरात काढण्यात आली आहे. एवढेच नाही तर त्यांच्या तोंडाला शेण फासण्यात आले, गळ्यात चपलांची माळ घालण्यात आली. असे का घडले?
जावई म्हणजे मुलीचा नवरा, त्याला सासरी एवढा मान असतो की सासू सासरे कुठे ठेवू आणि कुठे नको असे करतात. परंतू माखन नगरच्या सेंधरवाडा गावात राहणाऱ्या विवेक इवने याच्याबाबत विचित्र प्रकार घडला आहे. त्याचे ८ डिसेंबरल २०२१ ला लग्न झाले होते. त्याची पत्नी सुमन नर्सिंगचे शिक्षण घेत आहे. यावेळी नर्सिंग कॉलेजची मान्यता रद्द झाल्याने ती माहेरी गेली होती. पती पत्नीमध्ये काही कारणावरून वाद झाला होता, यामुळे ती सासरी जाण्यास तयार नव्हती.
पती विवेक तिला आण्यासाठी गेला होता. याची कल्पना त्याने आधी दिली नव्हती. परंतू सासरी पोहोचल्यावर त्याने सुमनला याची फोन माहिती दिली. मंगळवारी रात्री तो तिथे पोहोचला होता. यावरून सासरची मंडळी आणि त्याच्यात सुमनला पाठविण्यावरून वाद झाला. तो तिला नीट वागवत नाही असा आरोप सासूने केला. यावर जावयाने सुमनला घेऊनच जाणार असल्याचे म्हटल्याने वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. विवेकचे हातपाय बांधण्यात आले. कपडे उतरविण्यात आले. डीजे बोलविण्यात आला आणि मोठमोठ्याने गाणी वाजवत गावभर वरात काढण्यात आली.
धक्कादायक बाब म्हणजे सारे गावदेखील लाठ्या काठ्या घेऊन यात सामिल झाले. जावयाच्या तोंडाला शेण फासण्यात आले. हा प्रकार झाल्यानंतर जावयाने पथरौटा पोलीस ठाण्यात तक्रार केली. यावरून पोलीस अधिकारी एम एस बट्टी यांनी सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.