शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 17:45 IST

हल्लेखोरांना त्वरीत अटक करावी अशी मागणी गोवा राज्याचे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे.

ठळक मुद्देदिवसाढवळया घडलेल्या या खूनी हल्ल्यामुळे व्यापारीवर्गातही भितीचे वातावरण पसरले आहे.

मडगाव: गोव्यातील मडगावातआज बुधवारी दिवसाढवळया एका सराफाचा हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली. स्वप्नील वाळेक असे मयताचे नाव असून, भाजपाच्या राज्य कार्यकरणीच्या सदस्या कृष्णा वाळके यांचा तो मुलगा होता. शहरातील ग्रेस चर्चच्या मागच्या बाजूला वाळके यांचे कृष्णी ज्वेलर्स नावाचे आस्थापन असून, दुपारी बारा वाजता या आस्थापनात दोघेजण आत शिरले, त्यांच्याकडे रिव्हॉलवर व चाकूही होता. चाकूने वार केल्याने स्वप्नील हा गंभीर जखमी झाला. हल्ला केल्यानंतर संशयिताने पळ काढला. जखमी अवस्थेत स्वप्नील याला १०८ मदतसेवेच्या अ‍ॅम्बुलन्समधून हॉस्पिसियोत दाखल केले असता, त्याला मरण आले. दिवसाढवळया घडलेल्या या घटनेमुळे शहरात भितीचे वातावरण पसरले आहे. हल्लेखोरांना त्वरीत अटक करावी अशी मागणी गोवा राज्याचे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे.

दिवसाढवळया घडलेल्या या खूनी हल्ल्यामुळे व्यापारीवर्गातही भितीचे वातावरण पसरले आहे. हल्लेखोर चोरीच्या उददेशाने या सराफी दुकानात आत शिरले व नंतर स्वप्नीलने त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावर खुनी हल्ला झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. संशयिताने हल्ला केल्यानंतर ते पळून गेले. यातील एकाच्या हाती चाकू होता. सराफी दुकानातून मोठयामोठयाने आवाज ऐकू आल्यानंतर आजूबाजूचे लोक घटनास्थळी जमले. मात्र एक हल्लेखोर हातात चाकू घेउन असल्याने त्याला पकडण्यासाठी पुढे सरावण्यासही ते घाबरले. लोकांनी त्याच्यावर दगडही फेकले, त्याही अवस्थेत तो पळून गेला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर दक्षिण गोवा पोलीस अधिक्षक पंकजकुमार सिंग हेही घटनास्थळी दाखल झाले. भादंसंच्या ३0२ कलमाखाली मडगाव पोलिसांनीखून म्हणून हे प्रकरण नोंदवून घेतले असून, संशयितांचा शोध चालू असल्याची माहिती दक्षिण गोवाा पोलीस अधिक्षक पंकजकुमार सिंग यांनी दिली. दरम्यान, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी गोवा राज्यात कायदा व सुव्यवस्था पुर्णपणे कोसळल्याचे हे ज्वलंत उदारहण असल्याचे सांगताना खुन्यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे. भाजपा गोवा प्रदेश सरचिटणीस तथा माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी या खूनी हल्लाचा निषेध केला असून, मडगाव पोलिसांनी त्वरीत कारवाई करुन संशयितांना अटक करावी अशी मागणी केली आहे.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनला ईडीने केली अटक

 

आईने व्हर्जिन मुलीसोबत शरीरसंबंधासाठी लावली बोली आणि केला इतक्या लाखांचा सौदा  

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसgoaगोवाBJPभाजपा