शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील बाप-लेकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 15:25 IST

दुचाकीला धडक देऊन चालक वाहनासह पसार झाला.

देवेंद्र धोटे -

बेनोडा शहीद (अमरावती) : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील बाप-लेकाचा मृत्यू झाल्याची घटना खडका फाट्यानजीक रेल्वे पुलाजवळ शनिवारी रात्री ८ च्या सुमारास घडली. दुचाकीला धडक देऊन चालक वाहनासह पसार झाला.

पोलीस सूत्रांनुसार, माणिकपूर येथील रहिवासी सुरेशसिंह चिचका मरसकोल्हे (६२) व त्यांचा मुलगा रामेश्वर सुरेशसिंह मरसकोल्हे (४०) हे दोघे शनिवारी सकाळी मोर्शी तालुक्यातील गणेशपूर येथे काही कामानिमित्त दुचाकीने गेले होते. सायंकाळच्या सुमारास माणिकपूर गावाकडे परत येत असता खडका फाट्यानजीक रेल्वे पुलाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील सुरेशसिंह व रामेश्वर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. 

अपघातास कारणीभूत वाहन पसार झाल्यानंतर मागाहून येणारी एक कार दुचाकीचालक रामेश्वरच्या अंगावरून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच बेनोडा (शहीद) पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. दोघांनाही वरूड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळी नजीकच्या गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. रविवारी दुपारच्या सुमारास बापलेकांवर माणिकपूर गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी शेकडो लोकांची उपस्थिती होती. घटनेचा पुढील तपास ठाणेदार मिलिंद सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली बेनोडा पोलीस करीत आहेत.

अलीकडच्या काळात मध्य प्रदेशातील भाजीपाला घेऊन अमरावतीला जाणारे पिकअप सुसाट धावत असतात. अशाच वाहनाने दुचाकीला धडक दिली असल्याचा संशय नागरिकांतून व्यक्त होत आहे. सायंकाळी व रात्रीदेखील चालणाऱ्या या सुसाट आणि बेधडक वाहनांचा बंदोबस्त करण्याची मागणी पोलिसांना नागरिकांनी केली आहे. 

टॅग्स :AccidentअपघातAmravatiअमरावतीPoliceपोलिस