पतीच्या डोक्यात घातला दगड, पत्नीसह चौघांवर गुन्हा; सोलापूरची घटना

By रवींद्र देशमुख | Updated: June 4, 2023 17:18 IST2023-06-04T17:18:28+5:302023-06-04T17:18:40+5:30

"कोणाला विचारून घराचं कुलूप तोडलं?", पतीच्या प्रश्नाने पत्नीचा राग अनावर

Solapur Crime husband hit by huge rock on his head by wife Case registered against four | पतीच्या डोक्यात घातला दगड, पत्नीसह चौघांवर गुन्हा; सोलापूरची घटना

पतीच्या डोक्यात घातला दगड, पत्नीसह चौघांवर गुन्हा; सोलापूरची घटना

रवींद्र देशमुख, सोलापूर: घराचे कुलूप तोडून घरातील संसारोपयोगी उपयोगी वस्तू घेऊन जाण्याबाबत विचारल्याच्या कारणावरून पत्नीने दगडाने मारल्याने पती जखमी झाला आहे. या प्रकरणी फिर्यादी सिद्राम धोंडीबा वाघमोडे ( वय ३७, रा. ससाणे नगर, एस. आर.पी. एफ कॅम्प, विजापूर रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पत्नीसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी सिद्राम वाघमोडे यांची पत्नी संगीता घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून आतील संसार उपयोगी साहित्य घेऊन जात होत्या. त्यावेळी फिर्यादीने पत्नी संगीताला तू कोणाला विचारून घराचे कुलूप तोडली व घरातील वस्तू का घेऊन जात आहे, असे विचारले. या कारणावरून तिच्यासोबत आलेल्या छोटा हत्ती वाहनाच्या चालकांनी व इतर एकाने मिळून पती सिद्राम यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्या पत्नीने खाली पडलेला दगड घेऊन फिर्यादी यांच्या डोक्यात मारून जखमी केले आहे व फिर्यादी यांच्या शर्टाच्या खिशातील २० हजार रुपये काढून घेतले असल्याचे असल्याची फिर्याद सिद्राम वाघमोडे यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पत्नी संगीता वाघमोडे, दोन वाहन चालक व त्यांचा आणखी एक साथीदार असे चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Solapur Crime husband hit by huge rock on his head by wife Case registered against four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.